(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाद झाल्यानंतर विराट कोहलीला राग अनावर, ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल
Virat Kohli Video : ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव करत भारताने विश्वचषक अभियानाची सुरुवात दिमाखात केली.
Virat Kohli Video : ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव करत भारताने विश्वचषक अभियानाची सुरुवात दिमाखात केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात लाजीरवाणी झाली होती. अवघ्या दोन धावात आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतले होते. या कठीण परिस्थितीत अनुभवी विराट कोहलीने राहुलच्या साथीने टीम इंडियाचा डाव सावरला. विराट कोहलीने 116 चेंडूत 85 धावांची मॅच विनिंग खेळी केली. पण बाद झाल्यानंतर विराट कोहलीला राग अनावर आला होता. विराट कोहलीचा ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहली स्वत:च्या डोक्यावर मारताना दिसत आहे. सामना जिंकून न दिल्यामुळे विराट कोहलीला राग आल्याचे दिसतेय. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
विराट कोहलीने चेन्नईमध्ये अतिशय कठीण परिस्थितीमध्ये झुंझार अर्धशतक ठोकले. विराट कोहलीने 116 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. विजय भारतीय संघाच्या दृष्टीक्षेपात असतानाच विराट कोहली बाद झाला. भारताला जिंकण्यासाठी फक्त 33 धावांची गरज असताना विराट कोहली तंबूत परतला. स्टेडिअममधील सर्व प्रेक्षकांनी विराट कोहलीच्या या खेळीचे टाळ्याच्या गजरात स्वागत केले. विराट कोहलीने सामन्याचे चित्र बदलले होते. पण विराट कोहली आपल्या कामगिरीवर नाखूश होता. विराट कोहलीचा राग ड्रेसिंगरुमध्ये गेल्यानंतर दिसून आला. सामना जिंकूनच मैदानाबाहेर जाण्याचा मानस असणारा विराट ड्रेसिंग रुममध्ये फ्रस्टेट असल्याचे दिसले. ड्रेसिंग रुममध्ये बसून आपल्या चुकीच्या फटक्याबाबत डोक्याला मारत असल्याचा विराट दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
We can't see him like this it's very hurtful for us🥺💔
— Navin Sahu (@NavinSahu522023) October 8, 2023
No matter century comes or not u r the only king man 👑
You are the best 🤗
Plzz somebody give him a tight hug on the behalf of us 🫶❤️#KingKohli #ViratKohli #Virat #INDvsAUS #ElvishArmy pic.twitter.com/IhaSHkwFBK
विराट विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू -
विराट कोहलीने विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू म्हणून मान मिळवला. विराट कोहलीने विश्वचषकाच्या 27 डावामध्ये 15 झेल घेतले आहेत. 2011 ते 2023 यादरम्यान विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक आहे. या विश्वचषकातील 27 सामन्यात विराट कोहलीने 15 झेल घेतले आहेत. अनिल कुंबळे याने 18 सामन्यात 14 झेल घेतले आहेत. सचिन तेंडुलकर याला 44 सामन्यात फक्त 12 झेल घेता आलेत.