Virat Kohli Fans Arrested: मैदानात जाऊन विराटसोबत सेल्फी घेणं महागात पडलं, पोलिसांनी चौघांना घेतलं ताब्यात
Virat Kohli Fans Arrested: भारत आणि श्रीलंका यांच्यात पिंक बॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या क्षणी चार चाहते सुरक्षेचं कडं तोडत मैदानात घुसले होते.
Virat Kohli Fans Arrested: भारत आणि श्रीलंका यांच्यात पिंक बॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या क्षणी चार चाहते सुरक्षेचं कडं तोडत मैदानात घुसले होते. तसेच त्यांनी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत सेल्फी घेतली. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. मात्र, आता याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी सेल्फी घेणासाठी मैदानात घुसलेल्या चौघांना ताब्यात घेतलंय. सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोपाखाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिलीय.
श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाच्या सहाव्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर श्रीलंकेचा फलंदाज कुशल मेंडिस दुखापतग्रस्त झाला. जखमी मेंडिसवर उपचार सुरू असताना स्टार खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी मिळताच चार चाहते मैदानात घुसले आणि खेळाडूंकडे धावू लागले. दरम्यान, चाहत्यांनी स्लिप्सवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या कोहली जवळ जाऊन सेल्फी घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या विरोधात कब्बन पार्क पोलीस स्टेशन परिसरात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी एकाला कलबुर्गी आणि दुसऱ्याला बेंगळुरू येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विराट कोहलीनं नेटकऱ्यांची मनं जिंकली.
श्रीलंका सुरू असताना खेळाडूंना जवळून पाहण्यासाठी मैदानात घुसले. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी खेळाडूंच्या दिशेने धावले. परंतु, त्यावेळी विराट कोहली पोलिसांकडं बोट दाखवत त्यांना काहीही करू नका, असं सांगितलं. विराटच्या या वागण्याने सगळ्यांचीच मनं जिंकली. यानंतर सोशल मीडियावरही विराट कोहलीचे खूप कौतुक होत आहे.
हे देखील वाचा-