एक्स्प्लोर

Video: विनोद कांबळीला नेमकं काय झालंय? डॉक्टरांनी दिली माहिती; क्रिकेटपटूने गायलं 'हे' गाणं, सगळेच भावूक

आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर हे बालपणापासून क्रिकेटचे चाहते असून त्यांनी विनोद कांबळी यांचे अनेक सामने पाहिले आहेत.

ठाणे : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू (Cricket) आणि 1990 च्या दशकातील स्टार फलंदाज विनोद कांबळी सध्या आर्थिक विवंचनेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर, पुन्हा एकदा विनोद कांबळीच्या आजाराची व आर्थिक परिस्थितीची सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली. त्यावेळी, विनोद कांबळीने (Vinod Kambli) गायलेलं गाणंही तुफान व्हाययरल झालं होतं. आता, पुन्हा एकदा विनोद कांबळीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. विनोद कांबळी यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी (Doctor) सांगितले आहे. दरम्यान, येथील रुग्णालयात एबीपी माझाच्या प्रतिनिधींशी बोलतान विनोद कांबळीने पुन्हा एकदा गाणं गायलं अन् सर्वांनाच भावूक करुन टाकलं. 

आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर हे बालपणापासून क्रिकेटचे चाहते असून त्यांनी विनोद कांबळी यांचे अनेक सामने पाहिले आहेत. सोशल मीडियावर कांबळींच्या प्रकृती अस्वस्थतेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी भावनिक होत त्यांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तत्काळ कांबळी यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. “विनोद कांबळी हे भारतासाठी योगदान देणारे महान खेळाडू आहेत. त्यांना मदतीची गरज असल्याचे पाहून मी त्यांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य मानले,” असे शैलेश ठाकूर म्हणाले. दरम्यान, विनोद कांबळी यांनी चाहत्यांना संदेश देत सांगितले, “माझी प्रकृती सुधारत आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे मला बळ मिळाले आहे.”. यावेळी त्यांनी गाणंही म्हटलं. 

मी एवढंच सांगेन, 
कल खेल मे हम हो नं हो
गर्दीश मे तारे रहेंगे यहाँ
भुलो गे तुम, भुलेंगे हम
पर हम तुम्हारे रहेंग सदा
रहेंग यदी अपने निशा
जिसके सिवाँ जाना कहाँ...

मेरा नाम जोकर या चित्रपटातील गाण्याचे हे बोल विनोद कांबळीने गायले आणि डॉक्टरांसह रुग्णालयात उपस्थित सर्वच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 

विनोद कांबळीला नेमकं काय झालंय?

न्यूट्रेशनल आणि युरिनरी प्रॉब्लेम आहे. विनोद कांबळी यांना लघवीचा त्रास वाढला असून मसल्स क्रॅम आहे. मसल्स क्रॅम असल्याने ते बसूही शकत नाहीत. त्यामुळे, आम्ही त्यांना तत्काळ रुग्णालयात आणून उपचारासाठी दाखल केले आहे. युरीन इन्फेक्शनचा प्रॉब्लम असून त्यांवरील उपचारपद्धती सुरू आहे. तसेच, न्युरोलॉजी, युरोलॉजी व आर्थोपिडीक तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची काळजी घेतली जात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे डॉक्टरांनी म्हटलं.  

विनोद कांबळींच्या उपचाराची जबाबदारी

आम्ही सर्वांनी संकल्प केला असून विनोद कांबळी यांच्यासाठी लाईफटाईम त्यांच्यावरील सर्वच उपचार मोफत करणार असल्याचे रुग्णालयातील प्रमुखांनी म्हटलं आहे. आम्ही त्यांचं क्रिकेट पाहूनच लहानाचे मोठे झालो आहोत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. सध्या तीन डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे. क्रिकेटप्रेमींनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शैलेश ठाकूर यांचा दयाळूपणा आणि माजी खेळाडूबद्दलची आस्था यामुळे भिवंडीत क्रिकेटप्रेमींच्या मनात त्यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

हेही वाचा

राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली! सोशल मीडियात रंगली चर्चा
राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली! सोशल मीडियात रंगली चर्चा
Vinod Kambli : विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Minister Bungalow : महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis : 10 दिवसांमध्ये तोडगा काढणार, फडणवीसांचं आश्वासनCyber Crime : सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा, 'Digital Arrest'च्या जाळ्यात ओढून कोट्यवधींची लूटDevendra Fadnavis on Chhagan Bhujbal : 'दादांचा भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा विचार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली! सोशल मीडियात रंगली चर्चा
राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली! सोशल मीडियात रंगली चर्चा
Vinod Kambli : विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडे, कोण आहे हा? कार्यकर्ता आहे तुमचा? असे कार्यकर्ते लागतात तुम्हाला? अंजली दमानियांनी आणखी एक बंदुकधारी समोर आणला!
धनंजय मुंडे, कोण आहे हा? कार्यकर्ता आहे तुमचा? असे कार्यकर्ते लागतात तुम्हाला? अंजली दमानियांनी आणखी एक बंदुकधारी समोर आणला!
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
Sunny Leone : सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
Embed widget