IND vs SCO: रिषभच्या खेळीबाबत विनोद कांबळीचे मोठे वक्तव्य, पाहा काय म्हणाले?
IND vs SCO: रिषभ पंतने अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात 207.69 च्या सरासरीने फलंदाजी केली होती.
Vinod Kambli on Rishabh Pant: टी-20 विश्वचषकातील 37 व्या सामन्यात भारतीय संघ स्कॉटलँडशी भिडणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी रिषभ पंतच्या खेळीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. "ऋषभ पंत स्कॉटलँडविरुद्ध सामन्यात चमत्कार घडवू शकतो. आजच्या सामन्यात रिषभची आक्रमक खेळी पाहता येईल, अशीही त्यांनी शक्यता वर्तवली आहे.
विनोद कांबळी म्हणाले की, स्कॉटलँडविरुद्ध सामन्यात रिषभ पंतकडून चांगली कामगिरी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. या खेळाडूत धोनीची झलक दिसते. जर रिषभ पंत स्कॉटलंडविरुद्ध सामन्यात पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला तर तो चमत्कार घडवू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
टी-20 विश्वचषकात भारताची आतापर्यंतची कामगिरी
यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारताने आतापर्यंत एकाच सामना जिंकला आहे. तर, भारताला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारताने त्यांच्या मागील सामन्यात अफगाणिस्तानला 66 धावांनी पराभूत केले. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पुढील सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. याशिवाय, इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.
नाणेफेक महत्त्वाचा-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या स्पर्धेत एकदाही नाणेफेक जिंकले नाही. आजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्डेडिअमवर खेळला जाणार आहे. येथे आतापर्यंत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या संघांनी 90 टक्के विजय मिळवला आहे. यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेक पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
संघ-
भारत संभाव्य संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
स्कॉटलँड संभाव्य संघ-
जॉर्ज मुन्से, काइल कोएत्झर (सी), मॅथ्यू क्रॉस (विकेटकीप), रिची बेरिंग्टन, कॅलम मॅक्लिओड, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्हज, मार्क वॉट, सफयान शरीफ, अलास्डेअर इव्हान्स आणि ब्रॅडली व्हील.
संबंधित बातम्या-