'सुपरस्टार' ड्वेन ब्राव्होची T20 वर्ल्डकपनंतर निवृत्तीची घोषणा; 6 नोव्हेंबरला खेळणार शेवटचा सामना
गतविजेता वेस्ट इंडिज गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध 20 धावांनी पराभव झाल्याने 2021 टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला. या सामन्यानंतर स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.
Dwayne Bravo Retired from International Cricket: गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर 'डिफेंडिंग चॅम्पियन' वेस्ट इंडिज 2021 टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला. कॅरेबियन संघाचा स्पर्धेतील हा तिसरा पराभव ठरला. या पराभवानंतर संघाचा 'सुपरस्टार' अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने सांगितले की, तो आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या शेवटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. मात्र, तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार की नाही हे त्याने सांगितले नाही. पण त्याने स्पष्ट केले आहे की त्याच्या संघाचा टी-20 विश्वचषकामध्ये 6 नोव्हेंबर रोजी होणारा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा शेवटचा साखळी सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल.
या वर्षी ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार किरन पोलार्डने घोषित केले की ड्वेन ब्राव्होने कॅरेबियनमध्ये शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय खेळला होता. श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी झालेल्या पराभवानंतर, फेसबुक शोमध्ये माजी कर्णधार डॅरेन सॅमी आणि समालोचक अॅलेक्स जॉर्डन यांच्याशी झालेल्या संभाषणात ब्राव्होने पुष्टी केली की तो यापुढे आयसीसीच्या सामन्यानंतर तो खेळणार नाही.
ब्राव्हो म्हणाला, "मला वाटते की आता वेळ आली आहे, माझी कारकीर्द खूप चांगली झाली आहे. 18 वर्षे वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करताना काही चढ-उतार आले, पण जेव्हा मी ते पाहतो तेव्हा मला वाटते की, माझा प्रदेश आणि कॅरिबियनचे इतके दिवस प्रतिनिधित्व करण्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे."
तो पुढे म्हणाला, "तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणे, दोन माझ्या कर्णधारासह (डॅरेन सॅमी), मला एका गोष्टीचा अभिमान आहे की क्रिकेटपटूंच्या युगात आम्ही जागतिक स्तरावर नाव कमावले आहे." दोन वेळा T20 विश्वचषक विजेता, ब्राव्होने वेस्ट इंडिजसाठी 90 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, यात 78 बळी घेतले आहेत आणि 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. सीम बॉलिंग अष्टपैलू खेळाडूने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत 293 सामने खेळले आहेत.
या अनुभवी खेळाडूने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या भविष्याबद्दल सांगितले, की जे पुढील पिढीला मदत करू शकते. तो म्हणाला, "माझ्याकडे जो काही अनुभव आणि माहिती आहे ती तरुण खेळाडूंसोबत देण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. मला वाटते की व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे आणि आम्ही लोकांना पाठिंबा देणे आणि प्रोत्साहन देणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे."
ब्राव्हो म्हणाला की, आम्हाला अपेक्षित असलेला हा विश्वचषक नव्हता, खेळाडू म्हणून आम्हाला जे हवे होते ते या विश्वचषकात सिद्ध झाले नाही. आम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटू नये, ही एक कठीण स्पर्धा होती, आपण आपले मनोबल उंच ठेवले पाहिजे. ब्राव्होने आपल्या पिढीतील वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंनी पुढच्या पिढीसाठी जो वारसा सोडला त्याबद्दल अभिमानाने सांगितले.