IndU19 vs AusU19, Semi Final: कर्णधार यशसह रशीदने सावरला डाव, भारताचं ऑस्ट्रेलियासमोर धावाचं 291आव्हान
IND U19 vs AUS U19 Semi Final Match :अंडर-19 विश्वचषकाचा सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असून भारताने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 291 धावांचे आव्हान ठेवले आहे.
![IndU19 vs AusU19, Semi Final: कर्णधार यशसह रशीदने सावरला डाव, भारताचं ऑस्ट्रेलियासमोर धावाचं 291आव्हान U19 Cricket World Cup 2022: India U19 given target of 291 runs to Australia U19, know score and other details IndU19 vs AusU19, Semi Final: कर्णधार यशसह रशीदने सावरला डाव, भारताचं ऑस्ट्रेलियासमोर धावाचं 291आव्हान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/02/17f80fc94a98bbdbf283e518c18c18bd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IndU19 vs AusU19, Semi Final: भारताचा क्रिकेट संघ (U19 Team India) अंडर 19 विश्वचषकात (Under 19 World Cup) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळत असून प्रथम फलंदाजी करताना भारताने एक आव्हानात्मक लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं आहे. भारताचे सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार यशसह शेख रशीदने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 291 धावाचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियातील अंटीगा येथील कूलीज क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात आता भारताला उत्तम गोलंदाजीचं दर्शन घडवावं लागणार आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकत भारताचा कर्णधार यश धुल याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर फलंदाजीला आलेले सलामीवीर हरनूर सिंग आणि अंगक्रिश रघुवंशी हे खास कामगिरी करु शकले नाहीत. अंगक्रिश सहा तर हरनूर 16 धावा करुन तंबूत परतला. त्यामुळे 37 धावांवर भारताचे दोन गडी बाद झाले असताना कर्णधार यश आणि शेख रशीद यांनी भारताचा डाव सावरत अप्रतिम भागिदारी केली. यशने 110 चेंडूत 110 धावा केल्या तर यश मात्र शतकाच्या अगदी जवळ जाऊन 94 धावांवर बाद झाला. ज्यानंतर राजवर्धन हंगर्गेकर 13 धावा करुन तंबूत परतला. अखेर दिनेश बाना (नाबाद 20) आणि निशांत सिंधू (नाबाद 12) यांनी 50 षटकापर्यंत क्रिजवर राहत 290 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे आता विजयासाठी ऑस्ट्रेलियाला 291 धावा करायच्या आहेत.
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा प्रवास
भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे सहा खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले. यात कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि मानव पारीख आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. युगांडाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातही खेळले नव्हते. मात्र, संघाच्या बेंच स्ट्रेंथच्या जोरावर भारताने हे सामने सहज जिंकून गटातील अव्वल संघ म्हणून उपांत्यपूर्व फेरी गाठली. यादरम्यान धुळच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूनं संघाची कमान सांभाळली होती.
हे देखील वाचा-
- IPL 2022 Player Auction List Announced: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये 590 खेळाडूंवर लागणार बोली; कोणत्या संघाकडं किती पैसे शिल्लक? पाहा संपूर्ण यादी
- IPL Mega Auction 2022: कगिसो रबाडा मालामाल होणार, आकाश चोप्राची भविष्यवाणी
- Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच मैदानात, 'या' चार शहरांमध्ये खेळवले जातील सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)