(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Mega Auction 2022: कगिसो रबाडा मालामाल होणार, आकाश चोप्राची भविष्यवाणी
आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी बंगळुरू येथे होणार आहे.
IPL Mega Auction 2022: आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी बंगळुरू येथे होणार आहे, ज्यामध्ये दहा संघांचे मालक आणि प्रतिनिधी सहभागी होतील. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये गोलंदाज कगिसो रबाडावर (Kagiso Rabada) सर्वाधिक बोली लागेल,अशी भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं (Aakash Chopra) भविष्यवाणी केलीय.
" टी-20 क्रिकेटमध्ये डेथ बॉलर्सची महत्त्वाची भूमिका असते. कारण शेवटच्या षटकांतच खेळ बदलतो. शेवटच्या काही षटकात विजय आणि पराभव यातील फरक ठरतो. आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, मिचेल स्टार्क, भुवनेश्वर कुमार, कगिसो रबाडा, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्टसारखे अनेक डेथ बॉलर्स आहेत. हे सर्व गोलंदाज उत्कृष्ट आहेत. एनरिक नोर्टजेला आणि जसप्रीत बुमराहलाही संघात कायम ठेवण्यात आलंय. महत्वाचं म्हणजे, अनेक डेथ बॉलर्सला रिलीज करण्यात आलं आहे. ज्यात कगिसो रबाडाही आहे. कागिसो रबाडा लिलावात सर्वात महागडा वेगवान गोलंदाज ठरेल कारण आता त्याच्या दर्जाचा कोणताही डेथ ओव्हर गोलंदाज नाही, असं मत आकाश चोप्रानं त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्यक्त केलंय.
कागिसो रबाडानंतर ट्रेंट बोल्ड, मार्क वुड आणि लॉकी फर्ग्युसन या गोलंदाजांना चांगली किंमत मिळू शकतं, असेही आकाशनं म्हटलंय. जोस हेजलवूड, हर्षल पटेल, आवेश खान, दीपक चहर, टी नटराजन, प्रसिद्ध कृष्णा, उमेश यादव या गोलंदाजांना चांगला भाव मिळण्याची आशाही आकाश चोप्राने व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022 Player Auction List Announced: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये 590 खेळाडूंवर लागणार बोली; कोणत्या संघाकडं किती पैसे शिल्लक? पाहा संपूर्ण यादी
- PKL 2021 Live Streaming: बंगाल वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्सचा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा?
- Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच मैदानात, 'या' चार शहरांमध्ये खेळवले जातील सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha