(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Team India Next Captain: विराटनंतर कसोटी कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे? 'हे' आहे मुख्य कारण
भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराटने नुकताच कर्णधारपदाचा राजीनामा दिला. ज्यामुळे आता भारतीय कसोटी संघाची धुरा कुणाच्या हाती जाणार? हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
Team India Next Captain : भारतीय कसोटी कर्णधारपद सध्या रिक्त आहे. सर्वात यशस्वी कर्णधार विराटच्या (Virat Kohli) अचानक राजीनाम्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढे (BCCI) या पदावर कोणत्या खेळाडूला नेमायचा हा मोठा प्रश्न आहे. उपकर्णधार रोहितचंच नाव चर्चेत आहे, पण आता बीसीसीआयच्या सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार याजागी युवा खेळाडू केएल राहुलची वर्णी लागू शकते. याला काही खास कारणंही आहेत.
तर भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार असणाऱ्या विराट कोहलीने शनिवार, 15 जानेवारी, 2021 रोजी अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. टी20 आणि एकदिवसीय कर्णधारपदआधीच सोडलेल्या विराटने आता कसोटी कर्णधारपदही सोडलं. तर टी20 आणि वनडे कर्णधारपद रोहितकडे गेल्यामुळे हे पदही त्याच्याकडे जाईल असं अनेकांना वाटत आहे. त्यात तोच उपकर्णधारही आहे. पण असं होण्याची शक्यता कमी आहे. याला तसं कारणही आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी ज्याप्रमाणे विराटला सर्व प्रकारच्या संघाचा कर्णधार करण्यात आला ज्यानंतर त्याच्यावर बराच ताण असल्याचं समोर आलं. तेच पुन्हा नको व्हायला म्हणून रोहितच्या जागी राहुलचं नाव समोर येत आहे. तसंच फिटनेस आणि कामाचा ताण तसंच ट्रॅव्हलींग, विविध दौरे या सगळ्यात दोन कर्णधार असल्यास त्यांना विश्रांती घेता येऊ शकते. ज्यामुळे मर्यादीत षटकांचा कर्णधार रोहित आणि कसोटीचा राहुल होऊ शकतो असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.
राहुलची सुरुवात मात्र निराशाजनक
केएल राहुल एक उत्तम दर्जाचा खेळाडू असून स्थानिक पातळीवर त्याने कर्णधारपदही उत्तम सांभाळलं आहे. पण नुकताच दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दुसऱ्या कसोटीत राहुलला परदेशी भूमीत भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद सांभाळण्याची संधी मिळाली. पण या पहिल्याच सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागल्याने त्याची सुरुवात काहीशी निराश झाली आहे. पण असे असले तरी तो भविष्यात उत्तम कामगिरी करेल अशी आशा सर्वच भारतीयांना आहे.
हे ही वाचा :
- विराटच्या कसोटी कर्णधार पदाच्या राजीनाम्यानंतर रोहितची सोशल मीडिया पोस्टही व्हायरल, म्हणतो 'हे तर धक्कादायक!'
- Virat Kohli : विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले
- विराट कोहलीच्या राजीनामापत्रात केवळ दोन नावं, कर्णधारपद सोडताना कोहली नेमकं काय म्हणाला?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha