विराटच्या कसोटी कर्णधार पदाच्या राजीनाम्यानंतर रोहितची सोशल मीडिया पोस्टही व्हायरल, म्हणतो 'हे तर धक्कादायक!'
स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने टी 20 आणि एकदिवसीय कर्णधारपदानंतर नुकताच भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदाचाही राजीनामाही दिला. ज्यानंतर सर्वत्र याच गोष्टीची चर्चा सुरु आहे.
Rohit Post After Virat Resigned Test Captaincy : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवार, 15 जानेवारी, 2021 रोजी अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. टी20 आणि एकदिवसीय कर्णधारपदआधीच सोडलेल्या विराटने आता कसोटी कर्णधारपदही सोडल्याने विराटच्या चाहत्यांसह सर्वच भारतीयांना धक्का बसला. भारताचा मर्यादीत षटकांचा कर्णधार रोहित शर्मानेही एक इन्स्टाग्राम पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रोहितने इन्स्टा पोस्टमध्ये विराट आणि त्याचा कसोटी सामना खेळतानाचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे, 'हे धक्कादायक आहे. पण भारतीय कसोटी संघाचा कर्णधारपद उत्तम रित्या सांभाळल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा!'
विराट कोहलीने आपल्या ट्वीटमध्ये काय म्हटला
सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडलेली नाही. कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच योग्य वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही, किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा 120 टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता.
मला इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत देशाचं नेतृत्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल बीसीसीआयचे आभार व्यक्त करतो. तसेच पहिल्या दिवसापासून मला साथ देणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तुमच्यामुळे माझं करियर संस्मरणीय आणि सुंदर झाल. रवी भाई (रवी शास्त्री) आणि सपोर्ट स्टाफ यांचेही आभार, यांच्यामुळे भारतीय संघाची कामगिरी उंचावली. भारतीय संघाच्या यशात यांचाही मोलाचा वाटा आहे. सर्वात अखेरीस एम.एस. धोनीचेही आभार.. त्याने कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला अन् त्याला माझ्यात भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाणारा खेळाडू दिसला.
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
विराटची कामगिरी
विराट कोहलीने भारतीय संघाचे 68 कसोटी सामन्यात नेतृत्व केलं आहे. यादरम्यान भारतीय संघाला 40 सामन्यात विजय मिळाला आहे. तर 17 सामन्यात पराभव झाला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी 99 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 7962 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये कोहलीच्या नावावर 27 शतक आणि 28 अर्धशतक आहेत.
हे ही वाचा :
- Virat Kohli : विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले
- Captaincy Record: विराट तिसऱ्या स्थानी, जगातील अव्वल दहा कसोटी कर्णधार, पाहा यादी
- विराट कोहलीच्या राजीनामापत्रात केवळ दोन नावं, कर्णधारपद सोडताना कोहली नेमकं काय म्हणाला?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha