एक्स्प्लोर

Team India Next Cricket Schedule: वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका जिंकली; आता रोहित अन् विराट भारतीय संघात परतणार; पाहा टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

Team India Next Cricket Schedule: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने 2-0 अशा फरकारने मालिका जिंकली.

Team India Next Cricket Schedule: भारत आणि वेस्ट इंडिज (Ind vs WI) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने 2-0 अशा फरकारने मालिका जिंकली. आता भारत ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकेटप्रेमींचं रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा भारतीय संघाच्या जर्सीत कधी जिंकणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसतील.

विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतात. टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, जिथे प्रथम तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबर रोजी ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाईल, जो विराट आणि रोहितच्या पुनरागमनाची संभाव्य तारीख आहे.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs Aus Schedule)

पहिला एकदिवसीय सामना: 19 ऑक्टोबर (ऑप्टस स्टेडियम)

दुसरा एकदिवसीय सामना: 23 ऑक्टोबर (अ‍ॅडलेड ओव्हल)

तिसरा एकदिवसीय सामना: 25 ऑक्टोबर (एससी ग्राउंड)

पहिला टी-20: 29 ऑक्टोबर (मनुका ओव्हल)

दुसरा टी-20: 31 ऑक्टोबर (एमसीजी)

तिसरा टी-20: 2 नोव्हेंबर (बेलेरिव्ह ओव्हल)

चौथा टी-20: 6 नोव्हेंबर (हेरिटेज बँक स्टेडियम)

पाचवा टी-20: 8 नोव्हेंबर (गब्बा स्टेडियम)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, टीम इंडिया मायदेशी परतेल, जिथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर 14 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरू होईल. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आणि टी-20 मालिका होईल.

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs SA Schedule)

पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)

दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)

पहिली एकदिवसीय: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम)

दुसरी एकदिवसीय: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम)

तिसरी एकदिवसीय: 6 डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम)

पहिली टी-20: 9 डिसेंबर (बारबती स्टेडियम)

दुसरी टी-20: 11 डिसेंबर (पीसीए स्टेडियम)

तिसरी टी-20: 14 डिसेंबर (एचपीसीए स्टेडियम)

चौथी टी-20: 17 डिसेंबर (एकाना स्टेडियम)

पाचवी टी-20: 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)

दिल्ली कसोटीत टीम इंडियाचा मोठा विजय- (Team India Won vs West Indies Test Series)

वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 518 धावांचा डोंगर उभारला आणि पहिली डाव घोषित केला. प्रत्युत्तर वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 248 धावांवर आटोपला. मालिकेत वेस्ट इंडिजची फलंदाजी आतापर्यंत निराशाजनक राहिल्याने भारताने त्यांना फॉलोऑन दिला. मात्र, फॉलोऑन मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी पुनरागमन करत 390 धावा करत भारतावर आघाडी मिळवली. भारतीय कसोटी इतिहासात ही फक्त चौथी वेळ आहे, जेव्हा टीम इंडियाला प्रतिस्पर्धी संघाने फॉलोऑन देऊन पुन्हा फलंदाजीस उतरायला भाग पाडले. शेवटी वेस्ट इंडिजने भारतासमोर 121 धावांचे लक्ष्य ठेवले, जे टीम इंडियाने सहज गाठत दुसऱ्या कसोटीत 7 गडी राखून विजय मिळवला.

संबंधित बातमी:

IND Beat WI 2nd Delhi Test : भारताचा वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश, दिल्ली कसोटी जिंकत मालिका 2-0 ने घातली खिशात; WTC च्या Points Table मध्ये टीम इंडिया कुठे?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget