एक्स्प्लोर

IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांसाठी भारतीय संघ सज्ज, 'या' 5 खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष

Team India : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या अर्थात 9 जून पासून पाच टी-20 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

India vs South Africa, T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना उद्या अर्थात 9 जून रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत असून पहिल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून सर्वच खेळाडू दमदार खेळ करण्याच्या प्रयत्नात असतील. तर भारतीय संघाचा विचार करता नेमकं कोणत्या 5 खेळाडूंवर सर्वांचं लक्ष असेल ते पाहूया...

  1. उम्रान मलिक : आयपीएल गाजवल्यानंतर आता वेगवान युवा गोलंदाज उम्रान मलिकला (Umran Malik) थेट भारतीय संघात एन्ट्री मिळाली आहे. वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधलेला उमरान आता भारतीय संघासाकडून आफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
  2. अर्शदीप सिंह : आणखी एक युवा गोलंदाज अर्थात अर्शदीप सिंहला (Arshdeep Singh) देखील भारतीय संघाचं तिकीट मिळालं असून त्याच्या गोलंदाजीकडेही अनेकांचे लक्ष आहे. डेथ ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंहला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळेल का? आणि मिळाल्यास तो कशी गोलंदाजी करेल हे पाहावे लागेल.
  3. दिनेश कार्तिक : आयपीएलमध्ये आरसीबीसाठी अगदी तुफान फटकेबाजी करत फिनिशर म्हणून नावारुपाला आलेल्या दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) बऱ्याच काळानंतर भारतीय संघात स्थान मिळालं आहे. त्याने आयपीएलमध्ये तर 16 सामन्यात 183.33 स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या. आता असाच फॉर्म तो टीम इंडियासाठीही कायम ठेवतो का? हे पाहावे लागेल.
  4. हार्दिक पांड्या : आयपीएल 2022 स्पर्धेत हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याच्या नेतृत्त्वाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. हार्दिकच्या नेतृत्तवाखालीच गुजरात टायटन्सने आयपीएलचा चषक जिंकला असून त्यानंतर लगेचच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) सामन्यांसाठी हार्दिकची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे या सामन्यांवेळी हार्दिकचा फॉर्म चांगला असेल का? तो गोलंदाजीतही कमाल करेल का? अशा साऱ्या गोष्टींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
  5. ऋतुराज गायकवाड : भारताचा आणखी एक युवा खेळाडू ज्याच्याकडे अनेकांचे लक्ष असेल तो म्हणजे सलामीवीर ऋतुराज गायकवाड. आयपीएल 2021 मध्ये तुफान फलंदाजीनंतर टीम इंडियात निवड होऊनही अधिक संधी न मिळाल्याने गायकवाड हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. आतातरी त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळणार का? आणि मिळाल्यास कशी कामगिरी करेल, याकडे अनेकांचे लक्ष आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक

सामना दिनांक  ठिकाण
पहिला टी20 सामना 9 जून अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
दुसरा टी20 सामना 12 जून बाराबती स्टेडियम, कट्टक
तिसरा टी20 सामना 14 जून डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम
चौथा टी20 सामना 17 जून सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट
पाचवा टी20 सामना 19 जून एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget