एक्स्प्लोर

Team India Fixtures 2024-25: टी20 विश्वचषकानंतर टीम इंडिया बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंडविरुद्ध भिडणार; बीसीसीआयने जाहीर केलं वेळापत्रक

Team India Fixtures 2024-25: बीसीसीआयने 2024-2025 हंगामासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Team India Fixtures 2024-25: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2024-2025 हंगामासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक (Team India Fixtures) जाहीर केले आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे व श्रीलंकेचा दौरा करणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध एकूण 5 कसोटी सामने, 8 टी-20 सामने आणि 3 वन डे सामने खेळणार आहे. 

कोणासोबत कधी होणार सामने?

बांगलादेश-

भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात प्रथम बांगलादेशचे यजमानपद भूषवणार आहे. हा दौरा 19 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई आणि कानपूर येथे 2 कसोटी सामने होणार आहेत. आणि 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दोन्ही संघ 3 टी-20 सामन्यांमध्ये आमनेसामने येतील. हे 3 टी-20 सामने अनुक्रमे धर्मशाला, दिल्ली आणि हैदराबाद येथे आयोजित केले जातील.

न्यूझीलंड-

बांगलादेशविरुद्धची मालिका संपल्यानंतर 4 दिवसांनी भारतीय संघ न्यूझीलंडसोबत 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करणार आहे. न्यूझीलंडचा संघ 16 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत भारतासोबत 3 कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना बंगळुरुमध्ये, दुसरा पुण्यात आणि तिसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे.

इंग्लंड-

2025 च्या नवीन वर्षात भारतासमोर पहिले आव्हान इंग्लंडचे असेल. इंग्लंडचा भारत दौरा 22 जानेवारीपासून सुरू होईल आणि 12 फेब्रुवारीला संपेल. सुमारे 3 आठवड्यांच्या आत भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. या आठही सामन्यांचे यजमानपद आठ वेगवेगळ्या मैदानांवर सोपवण्यात आले आहे.

भारत झिम्बाब्वेविरुद्ध रंगणार मालिका-

या देशांतर्गत हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. T20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी भारत झिम्बाब्वेला भेट देणार आहे. 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024 IND vs AFG: भारत अन् अफगाणिस्तानच्या सामन्यात पावसाची बँटिंग?; बार्बाडोसमध्ये याआधी रद्द झाला होता एक सामना

Net Worth Of Gautam Gambhir: क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कमाईत चौकार-षटकार; गौतम गंभीरची संपत्ती किती?

T20 World Cup 2024 IND vs AFG: एक नव्हे...दोन सुपर ओव्हर; भारत अन् अफगाणिस्तानचा शेवटचा सामना झाला होता थरारक, नेमकं काय घडलेलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूरमधील नीट पेपरफुटीतील गंगाधरला पोलिसांनी अटक केलीय; पत्नीचा दावा
लातूरमधील नीट पेपरफुटीतील गंगाधरला पोलिसांनी अटक केलीय; पत्नीचा दावा
Pune Drug Case:  अहो, तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो; सुषमा अंधारेंचं शंभुराज देसाईंना सणसणीत प्रत्युत्तर
अहो, तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो; सुषमा अंधारेंचं शंभुराज देसाईंना सणसणीत प्रत्युत्तर
मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल, बीडमध्ये गोंधळ
मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल, बीडमध्ये गोंधळ
Uddhav Thackeray meets Devendra Fadnavis: तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!
तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Vidhan Sabha : अधिवेशनातील खडाजंगी :ठाकरे-फडणवीस भेट,शिंदेंचे आमदार भिडले, काय काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 27 June 2024Pravin Darekar On Uddhav Thackeray Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली? दरेकर काय म्हणाले?Uddhav Thackeray PC : उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीसांची लिफ्टमध्ये भेट; 3 मिनिटांच्या भेटीत काय चर्चा झाली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लातूरमधील नीट पेपरफुटीतील गंगाधरला पोलिसांनी अटक केलीय; पत्नीचा दावा
लातूरमधील नीट पेपरफुटीतील गंगाधरला पोलिसांनी अटक केलीय; पत्नीचा दावा
Pune Drug Case:  अहो, तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो; सुषमा अंधारेंचं शंभुराज देसाईंना सणसणीत प्रत्युत्तर
अहो, तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो; सुषमा अंधारेंचं शंभुराज देसाईंना सणसणीत प्रत्युत्तर
मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल, बीडमध्ये गोंधळ
मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल, बीडमध्ये गोंधळ
Uddhav Thackeray meets Devendra Fadnavis: तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!
तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!
Nashik Teachers Constituency Election 2024 : मी शपथ घेतो की...! निकालाआधीच झळकले विवेक कोल्हेंच्या विजयाचे बॅनर
मी शपथ घेतो की...! निकालाआधीच झळकले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या विजयाचे बॅनर, राजकीय चर्चांना उधाण
Eknath Khadse : 'मागून येणाऱ्यांना आधी संधी मिळते हे वाईट'; एकनाथ खडसेंची भाजप नेत्यांसमोर खदखद!
'मागून येणाऱ्यांना आधी संधी मिळते हे वाईट'; एकनाथ खडसेंची भाजप नेत्यांसमोर खदखद!
Ashwini bhave : लिंबू कलरची साडी अन्..., अश्विनी भावेंसाठी सिनेमाचा दिग्दर्शकच झाला व्हिडीओग्राफर
लिंबू कलरची साडी अन्..., अश्विनी भावेंसाठी सिनेमाचा दिग्दर्शकच झाला व्हिडीओग्राफर
Sushma Andhare:
"विषय संपला", ठाकरे-फडणवीस भेटीवर सुषमा अंधारेंची मोठी प्रतिक्रिया!
Embed widget