एक्स्प्लोर
Net Worth Of Gautam Gambhir: क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कमाईत चौकार-षटकार; गौतम गंभीरची संपत्ती किती?
Net Worth Of Gautam Gambhir: कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आणि माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर लवकरच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Net Worth Of Gautam Gambhir
1/11

टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपत आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
2/11

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप या विषयावर कोणतीही अधिकृत पुष्टी केली नसली तरी, बीसीसीआयला त्याच्या आयपीएलमधील प्रशिक्षक आणि मार्गदर्शन अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे असे दिसते.
3/11

गंभीर प्रशिक्षक होण्यापूर्वी, त्याची एकूण संपत्ती काय आहे आणि त्याच्याकडे किती मालमत्ता आहे हे जाणून घेऊया.
4/11

गौतम गंभीर हा पिनॅकल स्पेशालिटी व्हेइकल्स, क्रिकप्ले आणि रॅडक्लिफ लॅबचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे आणि या कंपन्यांमध्ये त्याचे शेअर्सही आहेत. त्याची एकूण संपत्ती अंदाजे 25 दशलक्ष यूएस डॉलर आहे, म्हणजे भारतीय चलनानूसार 208 कोटी रुपये...
5/11

गंभीर त्याच्या कारकिर्दीत तो अनेक आयपीएल संघांसाठीही खेळला आहे. सुरुवातीला, दिल्ली कॅपिटल्सने त्याला 2.9 कोटी रुपयांना विकत घेतले आणि 2011 मध्ये तो KKR फ्रँचायझीमध्ये सामील झाला.
6/11

यापूर्वी KKR मध्ये त्याचा आयपीएल पगार 11 कोटी रुपये होता, पण 2012 आणि 2014 च्या यशानंतर त्याचा पगार 12.5 कोटी रुपये झाला. 2018 मध्ये निवृत्तीनंतर तो हिंदी आणि इंग्रजीमध्ये क्रिकेट कॉमेंट्री करूनही कमाई करत आहे.
7/11

गौतम गंभीर हा भारतीय संघाच्या इतिहासातील सर्वात प्रतिभावान खेळाडू होता. त्याने सुमारे 15 वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले आणि या काळात त्याला 'मोठा मॅच प्लेयर' देखील म्हटले गेले. 2011 च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध 97 धावांची खेळी, तर 2007 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्याने पाकिस्तानविरुद्ध 54 चेंडूत 75 धावांची अप्रतिम आणि महत्त्वाची खेळी खेळली होती.
8/11

भारतासाठी, गंभीरने 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5,238 धावा केल्या, ज्यात 11 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 58 कसोटी सामन्यांमध्ये 4,154 धावा केल्या ज्यात 9 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. गौतम गंभीरने टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी 37 सामन्यांत 932 धावा केल्या आहेत.
9/11

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकरदासाठी गंभीरचं नाव निश्चित कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आणि माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर लवकरच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार आहेत. याबाबत महिन्याच्या शेवटी बीसीसीआयकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. सधा सुरु असलेल्या 2024 च्या टी 20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात येणार आहे.
10/11

गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द -गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिलेय. त्यानं टीम इंडियासाठी 147 व-नडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत. वन-डेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळलाय, यामध्ये 4154 धावा केल्या आहेत.
11/11

कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने द्विशतकही ठोकलेय. गौतम गंभीर याने 37 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामद्ये 932 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.
Published at : 19 Jun 2024 08:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
सातारा
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
