एक्स्प्लोर

T20 World Cup 2021, 2nd Semifinal, Pakistan vs Australia: सेमीफायनलपूर्वी पाकिस्तानची धाक-धूक वाढली, मॅच विनर खेळाडूंची प्रकृती बिघडली

T20 World Cup 2021, 2nd Semifinal, Pakistan vs Australia: टी-20 विश्वचषक 2021 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा संघ आज ऑस्ट्रेलियाशी  (PAK vs AUS) भिडणार आहे.

T20 World Cup 2nd Semi Final: टी-20 विश्वचषक 2021 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाशी  (PAK vs AUS) भिडणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात आज हा सामना रंगणार आहे. मात्र, या महत्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाला चिंतेत टाकणारी माहिती समोर आलीय. पाकिस्तानचे स्टार फलंदाज मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक यांची तब्येत बिघडलीय. हे दोघेही आजच्या सामन्यापूर्वी सराव करण्यासाठी मैदानात आले नाहीत. यामुळं पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण पाहायला मिळतंय.

रिझवान आणि मलिक यांना हलका ताप आल्याचे पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनानं सांगितलंय. ज्यामुळं या दोघांनी बुधवारी सराव सत्रात भाग घेतला नाही. या दोघांना संघाबाहेर ठेवण्यात आलंय. महत्वाचे म्हणजे, रिझवान आणि मलिक यांची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली. या दोघांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याचे सांगितलं जातंय.

 रिझवान- मलिकची टी-20 विश्वचषक 2021 मधील कामगिरी-

टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या संघानं जबरसस्त कामगिरी करून दाखवलीय. पाकिस्ताननं आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. यापैकी सर्व सामने पाकिस्ताननं जिंकले आहेत. पाकिस्तानच्या विजयात सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. रिझवान या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह मोहम्मद रिझवानं संघाला दमदार सुरुवात करून दिलीय. त्याने भारतीय संघाविरुद्ध दमदार खेळी करून दाखवली होती.

शोएब मलिकची संयमी खेळी-

या टी-20 विश्वचषकात शोएब मलिकनं पाकिस्तानसाठी संयमी खेळी केलीय. त्यानं न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध निर्णायक खेळी खेळल्या. शोएबनं स्कॉटलंडविरुद्ध धडाकेबाज अर्धशतकही झळकावलं. त्याचं अर्धशतक पाकिस्तानकडून टी-20 मधील सर्वात जलद अर्धशतक होतं. या विश्वचषकात शोएबचा स्ट्राईक रेट 187 इतका आहे. 

यामुळं दोन्ही खेळाडू तंदुरुस्त राहणे पाकिस्तानच्या संघासाठी अत्यंत गरजेचं आहे. जर हे दोन्ही खेळाडू संघाबाहेर राहिल्यास पाकिस्ताला सलामी आणि मधली फळी कमजोर होण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातम्या- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Embed widget