(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2024 Semi Final 1: नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची Playing XI
T20 World Cup 2024 Semi Final 1: टी-20 विश्वचषक 2024 चा पहिला सेमी फायनलचा सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु आहे.
T20 World Cup 2024 Semi Final 1: टी-20 विश्वचषक 2024 चा पहिला सेमी फायनलचा सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर या दोघांमधील सामना होणार आहे. ब्रायन लारा स्टेडियमवरील या विश्वचषकातील हा पाचवा सामना आहे, ज्यामध्ये प्रथमच एखाद्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागील चार सामन्यांपैकी, संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना त्यापैकी तीन जिंकले आहेत. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. अशा परिस्थितीत याच संघासह कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आज कोणताही संघ जिंकला तरी तो प्रथमच टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचेल.
A fast bowling rampage in Trinidad 🔥
— T20 World Cup (@T20WorldCup) June 27, 2024
South Africa claim six wickets in the first seven overs against Afghanistan in the first #T20WorldCup 2024 semi-final 👀https://t.co/CKjacjZ3w5
उपांत्य फेरीसाठी अफगाणिस्तानची प्लेइंग इलेव्हन
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झदरन, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
उपांत्य फेरीसाठी दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॉन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी.
टी20 विश्वचषक 2024 मध्ये दोन्ही संघाची कामगिरी -
अफगानिस्तान : साखळी फेरीत अफगानिस्तानने चार पैकी तीन सामन्यात विजय मिळवला. युगांडा, न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांचा पराभव केला. ग्रुप स्टेजमध्ये फक्त वेस्ट इंडिजकडून त्यांचा पराभव झाला. सुपर 8 मध्ये फक्त भारताविरोधात अफगाण संघाला पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्याविरोधात विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
दक्षिण अफ्रीका : साखळी फेरीत दक्षिण अफ्रीकाने सर्व सामने जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी नेदर्लंड, बांग्लादेश आणि नेपाळचा पराभव केला. त्यानंतर सुपर 8 मध्येही आफ्रिका संघ अजेय राहिला. त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना अफगाणिस्तानविरोधात होत आहे.