(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उपांत्य फेरीत 7 वेळा पराभूत, तब्बल 32 वर्षांनंतर द. अफ्रिका अंतिम फेरीत धडक; चोकर्सचा डागही पुसला!
T20 World Cup 2024 SA vs AFG: दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंतचा विश्वचषकातील प्रवास सोपा राहिलेला नाही.
T20 World Cup 2024 SA vs AFG: दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा 9 विकेट्स राखून पराभव केला. अफगाणिस्तानचा डाव 11.5 षटकात 56 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने केवळ 1 गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण अफ्रिकेवर आतापर्यंत चोकर्सचा टॅग होता, तो त्यांनी पुसुन काढला आहे. तसेच तब्बल 32 वर्षांनंतर दक्षिण अफ्रिकेचा संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे.
उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मारक कामगिरी केली. त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आफ्रिकन गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 56 धावांवर ऑलआउट केले. अफगाणिस्तानच्या एका फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला. अजमतुल्ला 10 धावा करून बाद झाला. सलामीवीर गुरबाजला खातेही उघडता आले नाही. इब्राहिम झद्रान 2 धावा करून बाद झाला. या सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी खराब झाली.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कहर केला -
दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने 3 षटकांत 16 धावा देत 3 बळी घेतले. शम्सीने 1.5 षटकात 6 धावा देत 3 बळी घेतले. रबाडाने 3 षटकांत 14 धावा देत 2 बळी घेतले. तर नॉर्खियाने 3 षटकांत 7 धावा देत 2 गडी बाद केले. मार्को जॉन्सनने दक्षिण आफ्रिकेला पहिली विकेट दिली. त्याने अफगाणिस्तानचा सलामीवीर गुरबाजला शून्यावर बाद केले होते.
उपांत्य फेरीत 7 वेळा पराभूत झाल्यानंतर अंतिम फेरीत धडक-
दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंतचा विश्वचषकातील प्रवास सोपा राहिलेला नाही. दक्षिण अफ्रिकेला आतापर्यंत उपांत्य फेरीत 7 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे संघाला चोकर्स म्हणूनही उल्लेख करण्यात येत होता. मात्र हा ट्रग आता दक्षिण अफ्रिकेने फुसण्याचा प्रयत्न केला आहे. 1992 च्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडकडून पराभव झाला होता. यानंतर 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. 2007 मध्येही ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता. यानंतर 2009 मध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. भारताने 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. 2015 मध्ये न्यूझीलंडकडून त्याचा पराभव झाला होता. यानंतर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
South Africa's nightmare of the World Cup Semi-final started in 1992 and it ended at Trinidad in 2024, the wait for 32 long years.
— Johns. (@CricCrazyJohns) June 27, 2024
- MARKRAM & HIS BOYS. 🫡 pic.twitter.com/jkhdT1gRQh
टी20 विश्वचषक 2024 मध्ये दक्षिण अफ्रिका संघाची कामगिरी-
साखळी फेरीत दक्षिण अफ्रीकाने सर्व सामने जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी नेदर्लंड, बांग्लादेश आणि नेपाळचा पराभव केला. त्यानंतर सुपर 8 मध्येही आफ्रिका संघ अजेय राहिला. त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला. त्यानंतर आज उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध 9 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.
संबंधित बातम्या:
विमान लेट, फक्त एका तासाची झोप...; सेमी फायनल खेळण्यापूर्वी अफगाणिस्तानसोबत काय काय घडलं?