विमान लेट, फक्त एका तासाची झोप...; सेमी फायनल खेळण्यापूर्वी अफगाणिस्तानसोबत काय काय घडलं?
T20 World Cup 2024 SA vs AFG: दक्षिण आफ्रिकेने 67 चेंडू आणि 9 विकेट्स शिल्लक असताना अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला.
![विमान लेट, फक्त एका तासाची झोप...; सेमी फायनल खेळण्यापूर्वी अफगाणिस्तानसोबत काय काय घडलं? T20 World Cup 2024 SA vs AFG Flight Delay Only one Hour Sleep What happened to Afghanistan before the semi-final, lets know विमान लेट, फक्त एका तासाची झोप...; सेमी फायनल खेळण्यापूर्वी अफगाणिस्तानसोबत काय काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/fbc90cab2d0e65dc7c99a7d8c3420b6a1719458688477987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
T20 World Cup 2024 SA vs AFG: टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आफ्रिकेने पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेने 67 चेंडू आणि 9 विकेट्स शिल्लक असताना अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला.
South Africa are through to their first Men's #T20WorldCup Final 🙌 pic.twitter.com/KwPr74MUJc
— ICC (@ICC) June 27, 2024
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा संघ 11.5 षटकांत केवळ 56 धावांवर सर्वबाद झाला. या काळात मार्को यानसेन आणि तबरेझ शम्सी यांनी संघाकडून सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने 8.5 षटकांत 1 गडी गमावत 60 धावा करून विजय मिळवला. मात्र अफगाणिस्तानला उपांत्य फेरीचा सामना खेळण्यापूर्वी घडलेल्या काही घटनांचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना फक्त एक तासाची झोप मिळाल्याची माहिती अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने दिली.
नाणेफेकीवेळी राशिद खान काय म्हणाला?
अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान नाणेफेीनंतर म्हणाला, आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. ही एक नवीन विकेट आहे. मधल्या फळीला जास्त वेळ मिळाला नाही. त्यांना चांगली फलंदाजी करावी लागेल आणि हे सोपे होणार नाही. सलामीवीरांनी जबाबदारी स्वीकारली आणि चमकदार फलंदाजी केली हे चांगले आहे. आमचे जळपास 4 तास फ्लाईट उशीरा होतं. जर तुम्ही फक्त 1 तास झोपला असाल तर ते सोपे नाही. तुमचे सर्वोत्तम असणे आवश्यक आहे, असं राशिद खान म्हणाला.
अफगाणिस्तानचा पराभव, पण मन जिंकलं-
टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानने शानदार कामगिरी केली आहे. मात्र, उपांत्य फेरीत संघाला विशेष काही करता आले नाही. पण तरीही त्याच्या गोलंदाजांनी ताकद दाखवली. उपांत्य फेरीत विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला 8.5 षटकांपर्यंत लढा द्यावा लागला. अफगाणिस्तानसाठी नवीन उल हकने 3 षटकांत 15 धावा दिल्या. फजलहक फारुकीने 2 षटकांत 11 धावा देत 1 विकेट पटकावली.
टी20 विश्वचषक 2024 मध्ये अफगानिस्तान संघाची कामगिरी-
साखळी फेरीत अफगानिस्तानने चार पैकी तीन सामन्यात विजय मिळवला. युगांडा, न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांचा पराभव केला. ग्रुप स्टेजमध्ये फक्त वेस्ट इंडिजकडून त्यांचा पराभव झाला. सुपर 8 मध्ये फक्त भारताविरोधात अफगाण संघाला पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्याविरोधात विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती.
संबंधित बातम्या-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)