T20 World Cup 2024 : सेमी फायनलमधील दोन संघ आजच निश्चित होणार,सुपर 8 मध्ये कोणते संघ आघाडीवर
T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 मधील लढती सुरु आहेत. सुपर 8 मध्ये आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.
अँटिग्वा : टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये सुपर 8 च्या (Super 8 Match) लढती सुरु आहेत. भारतानं (India) सुपर 8 मध्ये दुसरा विजय मिळवला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील मॅच काल पार पडली. या मॅचमध्ये भारतानं बांगलादेशला 50 धावांनी पराभूत केलं. सुपर 8 मधील ग्रुप 1 मध्ये भारत 4 गुणासंह पहिल्या स्थानावर आहे. तर, ग्रुप 2 मध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. सुपर 8 मध्ये सध्या ऑस्ट्रेलिया (Australia ) आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत सुरु आहे. या लढतीनंतर ग्रुप 1 मधून सेमी फायनलमध्ये कोणते दोन संघ पोहोचणार हे निश्चित होणार आहे.
सुपर 8 मध्ये आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप 1 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. तर, ग्रुप 2 मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि अमेरिकेचा समावेश आहे.ग्रुप 1 मध्ये भारत 4 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 1 विजयासह 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान तिसऱ्या तर बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे.
ग्रुप 2 मध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेनं अमेरिका आणि इंग्लंडला पराभूत केलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नावावर 4 गुण आहेत. यानंतर वेस्ट इंडिज नेट रनरेटच्या आधारे दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानी इंग्लंड आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन्ही संघांकडे सद्यस्थितीत प्रत्येकी 2 गुण आहेत. अमेरिका चौथ्या स्थानावर आहे.
ग्रुप 1 मधून सेमी फायनलमध्ये कोणते संघ पोहोचणार?
ग्रुप 1 मधील अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत सध्या सुरु आहे. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून अफगाणिस्तानला फलंदाजीला आमंत्रित केलं आहे. आजच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं विजय मिळवल्यास अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा टी 20 वर्ल्ड कपमधील प्रवास संपेल. ग्रुप 1 मधून भारत आणि ऑस्ट्रेलिया सेमी फायनमध्ये पोहोचू शकतात.
भारत आणि ऑस्ट्रेलिया उद्या आमने सामने येणार
ऑस्ट्रेलियानं भारताला वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत पराभूत करत विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या स्पर्धेत पुन्हा एकदा आमने सामने येत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीतील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानं मैदानात उतरण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांना यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणताही संघ पराभूत शकला नाही.
संबंधित बातम्या :