T20 World Cup 2022: '...तर माझ्या गोलंदाजीवर खेळणं अवघड!' पाकिस्तानच्या गोलंदाजाचं टीम इंडियाला खुलं आव्हान
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यात टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्याशी खेळणार आहे.
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यात टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्याशी खेळणार आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला होणाऱ्या महामुकाबल्याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफनं (Haris Rauf) भारतीय संघाला खुलं आव्हान दिलंय. बिग बॅश लीग (BBL) खेळण्याच्या अनुभवाच्या जोरावर तो भारताविरुद्धच्या सामन्यात यश संपादन करू शकेल, अशी त्याला आशा आहे.
दोन्ही देशातील राजकीय वादांमुळं गेल्या कित्येक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड खेळल्या जाणारा यावर्षातील चौथा सामना असेल. यापूर्वी रौफ म्हणाला की, "टी-20 विश्वचषकात मी सर्वोत्तम प्रदर्शन करण्यास यशस्वी ठरल्यास माझ्या गोलंदाजीवर खेळणं सोपं नसेल. मला आनंद झालाय की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात एमसीबी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडणार आहे." बीग ब्लॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळणारा रौफ पुढं म्हणाला की, हे माझं घरेलू मैदान आहे. “हे माझे घरचे मैदान आहे. कारण मी मेलबर्न स्टार्सकडून खेळतो. मला तिथं कसं खेळायचं? हे मला माहित आहे. भारताविरुद्ध गोलंदाजी कशी करायची? याचीही मी रणनीती आखायला सुरुवात केलीय.
हारिस रौफचा फॉर्म भारतासाठी घातक ठरण्याची शक्यता
दरम्यान, यूएईमध्ये खेळण्यात आलेल्या मागच्या टी-20 विश्वचषकात भारताला पाकिस्तानविरुद्ध लाजीरवाण्या पराभवाला सामारे जावा लागलं होतं. या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर नुकतीच पार पडलेल्या आशिया चषकातील साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं. परंतु, सुपर-4 मध्ये पाकिस्तानच्या संघानं भारताला पराभवाची धुळ चारली. "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात खूप दडपण पाहायला मिळतो. विश्वचषकात मी अनुभवलं आहे. पण आशिया चषक स्पर्धेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये मला दडपण जाणवलं नाही. कारण मला सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची आहे, हे माहीत होते." रौफ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 7 टी-20 सामन्यांच्या मालिकेत रौफनं पाकिस्तानच्या संघाला दोन सामन्यांमध्ये स्वबळावर विजय मिळवून दिलाय.
हे देखील वाचा-