(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neeraj Chopra: वाह, लय भारी! गोल्डन बॉय नीरज चोप्रा चाहत्यांसोबत खेळतोय गरबा; पाहा व्हिडिओ
Neeraj Chopra Garba Video: सध्या देशभरात नवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. याचदरम्यान गुजरातमध्ये आजपासून 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होणार आहे.
Neeraj Chopra Garba Video: सध्या देशभरात नवरात्रीचा (Navratri 2022) उत्सव उत्साहात साजरा होत आहे. याचदरम्यान गुजरातमध्ये आजपासून 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ( Narendra Modi Stadium) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडू (Indian Athletes) गुजरातच्या (Gujarat) बडोद्यामध्ये दाखल झाले आहेत. याचदरम्यान, भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राचा (Neeraj Chopra) चाहत्यांसोबत गरबा खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. नीरजनं गुजरातच्या बडोदा (Vadodara) येथे गरब्याचा आनंदा लुटलाय. या व्हिडिओला सोशल मीडियावर (Social Media) मोठी पसंती दर्शवली दाखवली जात आहे.
व्हिडिओ-
Olympic Gold Medallist Neeraj Chopra participating in Garba in Vadodara, #Gujarat.#NeerajChopra #NavratriFestival @Neeraj_chopra1 #Vadodara pic.twitter.com/XxynfXRt8w
— Rahul Singh Rajawat (@Rahulsi16973840) September 29, 2022
व्हिडिओ-
Olympic gold medalist #NeerajChopra performed Garba at #Navratri pic.twitter.com/EhgjtNLUKG
— Yazhini (@Yazhini_11) September 29, 2022
नीरजला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि डायमंड लीगमध्ये दहशत निर्माण करणारा नीरज त्याच्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत येऊ लागलाय. बडोद्यात सुरु असलेल्या नवरात्री उत्सवाह नीरज चोप्रासह कॉमेंटेटर चारु शर्माही उपस्थित होते. नीरज चोप्रानं त्याच्या चाहत्यांसह गरब्याचा आनंद लुटला. यावेळी नीरज चोप्रा पारंपारिक पोशाखात दिसला. नीरजनं स्थानिक लोकांसोबत गरबा खेळल्यानंतर त्याच्या चाहत्यांसोबतही बराच वेळ घालवला. नीरजला पाहण्यासाठी चाहत्यांची बरीच गर्दी जमली होती.
नीरज चोप्राचा मोठा निर्णय
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीरज चोप्रा यावेळी नॅशनल गेम्समध्ये सहभागी होणार नाहीये. डायमंड लीगच्या फायनलनंतर त्यानं राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलं होतं. डायमंड लीग हा सीझनमधील शेवटचा कार्यक्रम असल्याचं त्यानं सांगितलं होतं. नीरजनं अनेक प्रसंगी देशासाठी अप्रतिम कामगिरी केलीय. नीरज चोप्रा व्यतिरिक्त कांस्य विजेता पैलवान बजरंग पुनिया, पैलवान रवी कुमार, रिओ ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक यांनीही या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
हे देखील वाचा-