एक्स्प्लोर

Suryakumar Yadav: कॅलेंडर वर्षात फक्त सूर्याचा दबदबा; मोडतोय एकामागून एक विक्रम!

South Africa tour of India: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरुवनंतपुरमच्या (Thiruvananthapuram) ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर (Greenfield International Stadium) पहिला टी-20 सामना खेळण्यात आला.

South Africa tour of India: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरुवनंतपुरमच्या (Thiruvananthapuram) ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर (Greenfield International Stadium) पहिला टी-20 सामना खेळण्यात आला. या सामन्यात स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आणि सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 8 विकेट्सनं विजय मिळवला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 नं आघाडी घेतलीय. दरम्यान, भारताला विजय मिळवून देण्यासह सूर्यकुमार यादवनं टी-20 क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातलीय. कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत तो टॉपवर पोहचलाय. याशिवाय, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्यासह त्यानं पराक्रम केलाय.

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय संघाला बॅकफूटवर ढकललं. मात्र, त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सूर्यकुमारनं कोणताही दबाव न घेता आक्रमक फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. यासोबतच सूर्यकुमार यादवनं भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवनचा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवनलाही मागं टाकलंय.

शिखर धवनला मागं टाकलं
धवननं 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी 689 धावा केल्या होत्या. तर, सूर्यकुमारनं यावर्षी 700 हून अधिक धावांचा टप्पा गाठलाय. विराट कोहली एका कॅलेंडर वर्षात चार वेळा भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. 

षटकारांचा विक्रम मोडला
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात तीन षटकार मारणाऱ्या सूर्यकुमार यादवनं टी-20 क्रिकेटमध्ये खास विक्रमाला गवसणी घातलीय. यंदाच्या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. त्याच्या नावावर 45 षटकारांची नोंद आहे. यावर्षी पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान 42 षटकारसह दुसऱ्या आणि न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल 41 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियात पुढच्या माहिन्यात टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या बॅटीतून धावांचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. 

भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचं वेळापत्रक
टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. यानंतर 6 ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आता 2 ऑक्टोबरला दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे होणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये पार रडणार आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget