IND vs PAK : ना टीव्हीचा रिचार्ज, ना सबस्क्रिप्शनची गरज, फक्त एक काम करुन मोबाईलवर भारत पाकिस्तान मॅच मोफत पाहा
T20 World Cup : भारत आणि पाकिस्तान 9 जूनला टी-20 वर्ल्ड कपच्या निमित्तानं आमने सामने येणार आहेत. या मॅचकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
T20 World Cup 2024 Ind vs Pak Live Streaming न्यूयॉर्क : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज लढत 9 जून रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे दोन्ही पारंपरिक विरोधक न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी स्टेडिमयवर आमने सामने येतील. वनडे वर्ल्ड कपनंतर वर्षभराच्या आत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया आणि बाबर आझम याच्या नेतृत्त्वातील पाकिस्तान आमने सामने येत आहेत. भारतानं आयरलँड विरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवून दमदार सुरुवात केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानला नवख्या अमेरिकेनं पराभूत केलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. त्यामुळं भारत पाकिस्तान मॅच मोबाईलवर मोफत कशी पाहायची हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे.
भारत आणि पाकिस्तान मोफत मॅच कुठं पाहणार?
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी मॅच होणार आहे. ही मॅच हॉटस्टारची वेबसाईट, अॅप आणि स्टार स्पोर्टर्सवर पाहू शकतात. भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. दूरदर्शनवर देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच पाहता येईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच तुम्हाला मोफत पाहायची असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये डिस्ने हॉटस्टार हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. इथं तुम्हाला मोफत मॅच पाहता येईल.
डिस्ने हॉटस्टारच्या वेबसाईटला भेट देऊन देखील तुम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच पाहू शकता. मात्र, वेबसाईटवर मॅच पाहण्यासाठी तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे.
टीव्हीवर भारत आणि पाकिस्तान मॅच कुठं पाहणार?
टीव्हीवर तुम्ही भारत आणि पाकिस्तान मॅच स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहू शकता. या चॅनेल्सवर तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये मॅच पाहू शकता. स्टार स्पोर्ट्स 1 (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स 2 (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स 1 तामिळ (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु (एचडी+एसडी), मां गोल्ड, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड, सुवर्णा प्लस SD, डीडी स्पोर्ट्स वर देखील मॅच पाहता याईल.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरोधात वरचढ ठरला आहे.
संबंधित बातम्या :
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर