(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde On Narendra Modi | नरेंद्र मोदी, अमित शाहा जे निर्णय घेतली तो अंतिम असेल- एकनाथ शिंदे
Eknath Shinde On Narendra Modi | नरेंद्र मोदी, अमित शाहा जे निर्णय घेतली तो अंतिम असेल- एकनाथ शिंदे
: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय. महायुतीला महाराष्ट्रात 236 जागा मिळाल्या आहेत. 132 जागा मिळवून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पक्ष ठरलाय. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 तर शिंदेंच्या शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, 2022 मध्ये शिंदेंनी बंड केल्यानंतर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला होता. मात्र, मुख्यमंत्रिपद शिंदेंना देण्यात आले होते. आता महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपद कोणत्या पक्षाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील निवासस्थानी (दि.27) पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर भाष्य केलंय.
मी अगदी मनमोकळेपणाने काम करणारा माणूस आहे. सर्व पदांपेक्षा लाडका भाऊ हे मोठं पद आहे. मी प्रधानमंत्री साहेबांना फोन केला. त्यांना म्हणालो, सरकारमध्ये निर्णय घेताना आमची कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली. तुम्ही घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. निर्णय घेताना वाटू देऊ नका की, एकनाथ शिंदेची अडचण आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
'