Suresh Raina : 'मी ब्राह्मण आहे'; सुरेश रैनाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियात जोरदार ट्रोल
Suresh Raina : आपण ब्राह्मण असल्याने दक्षिण भारतीय संस्कृतीशी एकरुप झाल्याचं सुरेश रैनाने सांगितलं आहे. आता त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियातून टीका होत आहे.
चेन्नई : आपली ओळख ही उच्चवर्णीय जातीची असल्याचं सांगितल्याने माजी क्रिकटपटू सुरेश रैना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आपण ब्राह्मण असल्याने दक्षिण भारतीय संस्कृतीशी एकरुप झाल्याचं सुरेश रैनाने सांगितलं आहे. सुरेश रैनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याने माफी मागावी अशी मागणी करत अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.
तामिळनाडू प्रीमियर लीगचा पाचवा सीजन सुरु आहे. त्या दरम्यान एका व्हिडीओच्या माध्यमातून सुरेश रैना गप्पा मारत होता. एका कमेंटेटरने सुरेश रैनाला विचारलं की तो दक्षिण भारतीय संस्कृतीशी कशा प्रकारे मिसळला आहे. त्यावर सुरेश रैना म्हणाला की, "मला वाटतं मी ब्राह्मण आहे. 2004 सालापासून मी चेन्नई शहरात खेळतोय. मला इथल्या संस्कृतीशी प्रेम आहे, माझ्या सहकाऱ्यावंर माझे प्रेम आहे. मी अनिरुद्ध श्रीकांत सोबत खेळलोय, बद्री आणि बालाभाई सोबतही खेळलोय. मी भाग्यशाली आहे की मी चेन्नईचा हिस्सा आहे."
Did #SureshRaina just say ‘Am also a Brahmin’ on national telivision..😂😂
— The Illusionist (@JamesKL95) July 19, 2021
Chennai culture... hmmm#TNPL2021 pic.twitter.com/zKa2nwoeIs
सुरेश रैना हा 2008 सालापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. आता आपल्या जातीची ओळख सांगितल्याबद्दल त्याला सोशल मीडियात चांगलंच ट्रोल केलं जातंय. या प्रकरणी सुरेश रैनाने माफी मागावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. सोशल मीडियावर एका चाहत्याने लिहिलं आहे की, "सुरेश रैना, तू इतके वर्षे चेन्नईच्या संघासोबत राहूनही खऱ्या अर्थाने चेन्नईची संस्कृती शिकला नाहीस."
सुरेश रैनाच्या या वक्तव्यावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आयपीएल 2020 च्या सीजनमध्ये सुरेश रैना 'वैयक्तिक कारण' असल्याचं सांगत दुबईतून मायदेशी परतला होता. चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापन रैनाच्या या निर्णयावर नाराज होतं. असं असलं तरीही रैनाला 2021 च्या सीजनमध्ये पुन्हा संधी देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Cricket : ICC ने '15 डिग्री एल्बो नियम' मागे घ्यावा; पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकची मागणी
- India vs Sri Lanka, 2nd ODI: : अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध तीन विकेट्सने विजय, मालिकाही जिंकली
- IND Vs SL: IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत रोमांचक विजयाचा शिल्पकार दीपक चहरनं राहुल द्रविडला दिलं श्रेय