![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hardik Pandya : हार्दिक पांड्या ठरमार 'Gamechanger', बॅटिंग-बोलिंग दोन्हीने करणार कमाल, गावस्करांनी उधळली स्तुतीसुमनं
Hardik Pandya : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांसाठी भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मैदानात उतरला असून त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
![Hardik Pandya : हार्दिक पांड्या ठरमार 'Gamechanger', बॅटिंग-बोलिंग दोन्हीने करणार कमाल, गावस्करांनी उधळली स्तुतीसुमनं Sunil Gavaskar says Hardik pandya will be gamechanger with bat and bowl for team india Hardik Pandya : हार्दिक पांड्या ठरमार 'Gamechanger', बॅटिंग-बोलिंग दोन्हीने करणार कमाल, गावस्करांनी उधळली स्तुतीसुमनं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/12/b55f7362a23004b93ffbf85566979234_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hardik Pandya : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचं जेतेपद गुजरात टायटन्सनं जिकंल, यावेळी हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) दमदार खेळी करत उत्तम नेतृत्त्व देखील केलं. ज्यामुळे हार्दिक पांड्याला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) सामन्यांसाठी थेट टीम इंडियामध्ये (Team India) एन्ट्री मिळाली आहे. आता भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही हार्दिकचं कौतुक करत त्याला गेमचेन्जर (Hardik Pandya Gamechanger) अशी पदवी देत तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीने भारतीय संघासाठी योगदान देईल असंही ते म्हणाले.
स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना गावस्कर म्हणाले, ''हार्दिक पांड्याचा सध्याचा खेळ पाहता तो भारतासाठी गेमचेन्जर म्हणून सिद्ध होईल. तो बॅटिंग आणि बोलिंग दोन्हीने सामना पलटवू शकतो'' दरम्यान गावस्करांच्या या वक्तव्यावर पांड्या कितपत खरा उतरणार हे येणाऱ्या सामन्यांतून स्पष्ट होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याचा विचार करता हार्दिकने 12 चेंडूत 31 धावांची तुफान खेळी केली. त्यामुळे आता उर्वरीत टी20 सामन्यांमध्ये तो आणखी कमाल करणार का? हे पाहावे लागेल.
हार्दिकची आयपीएल 2022 मधील कामगिरी
यंदा हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार म्हणून उत्तम खेळत खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी केली. संघाला आयपीएल 2022 चं जेतेपद हार्दिकने मिळवून दिलं. शिवाय गुजरात टायटन्सकडून (GT) खेळताना हार्दिक पांड्याने 15 सामन्यात 487 रन केले आहेत. यावेळी त्याची सरासरी 44.27 असून स्ट्राइक रेट 131.26 इतका आहे. यावेळी त्याने 4 अर्धशतकं ठोकली असून 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो उत्तमप्रकारे गोलंदाजी देखील करताना दिसून आला.
- Mohammed Shami New Bike : मोहम्मद शामीने खरेदी केली Royal Enfield ची बाइक, जाणून घ्या किंमत
- Norway Chess Tournament 2022 : नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये विश्वनाथन आनंदनं मिळवलं तिसरं स्थान; फायनल राउंडमध्ये मिळवला विजय
- IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यातच चहलकडे विक्रम करण्याची संधी; घ्याव्या लागतील फक्त 3 विकेट्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)