Norway Chess Tournament 2022 : नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये विश्वनाथन आनंदनं मिळवलं तिसरं स्थान; फायनल राउंडमध्ये मिळवला विजय
Viswanathan Anand India : भारताचा दिग्गज बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदला या स्पर्धेतील एका सामन्यात बरीच मेहनत घ्यावी लागली, ज्यामुळे तो तिसरं स्थानच मिळवू शकला.
![Norway Chess Tournament 2022 : नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये विश्वनाथन आनंदनं मिळवलं तिसरं स्थान; फायनल राउंडमध्ये मिळवला विजय Viswanathan Anand Finishes Third in Norway Chess tournament know detailes Norway Chess Tournament 2022 : नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये विश्वनाथन आनंदनं मिळवलं तिसरं स्थान; फायनल राउंडमध्ये मिळवला विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/12/1e0fcf2fa5d8b734454dba07a3ef8cfa_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Viswanathan Anand in Norway Chess Tournament 2022 : भारताचा आघाडीचा बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदने आतापर्यंत जगातील अनेक मानाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. इतक्या वर्षानंतर अजूनही त्याचा खेळ तितकाच ताकदवर असून नुकत्याच पार पडलेल्या नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धा 2022 मध्ये आनंदने तिसरं स्थान मिळवलं. शुक्रवार रात्री पार पडलेल्या फायनल राउंडमध्ये आनंदने नॉर्वेच्या आर्यन तारीला मात देत आर्मगेडन गेममध्ये मिनी-मॅच जिंकली. यावेळी त्याचा क्लासिकल सामना अर्निणीत ठरला. आनंदला या सामन्याच्या अंतिम भागात जिंकनं अनिवार्य होतं, तो सामना जिंकेल असंही वाटत होतं. पण अखेर त्याने जास्त रिस्क न घेता सामना ड्रॉ वर समाप्त केला.
आनंदने स्पर्धेत 14.5 गुण मिळवत तिसरं स्थान मिळवलं. यावेळी विश्व चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने 16.5 गुण मिळवत पहिलं तर अजरबैजानच्या शखरियार मामेदयारोवने 15.5 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. फायनल राउंडमध्ये कार्लसनने टायब्रेकर गेममधअये बुल्गेरियाच्या वेसेलिन टोपालोवपेत्रा अधिक दमदार प्रदर्शन केलं. तर दुसरं स्थान मिळवलेल्या मामेदयारोवने तैमूर राजाबोवविरुद्ध सामना ड्रॉ करत टायब्रेकरमध्ये सामना जिंकत दुसरं स्थान मिळवलं.
भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदनं जिंकला खिताब
प्रज्ञानानंदनं नॉर्वे ओपनच्या नऊ फेऱ्यांमध्ये 7.5 गुणांसह नॉर्वेजियन बुद्धिबळ गट अ च्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरला. अव्वल मानांकित 16 वर्षीय जीएमनं चमकदार गती कायम ठेवली आणि संपूर्ण स्पर्धेत तो अपराजित राहिला. त्यानं शुक्रवारी उशिरा सहकारी भारतीय आंतरराष्ट्रीय मास्टर व्ही प्रणीतवर विजय मिळवून स्पर्धा पूर्ण केली. प्रज्ञानानंद (इएलओ 2642) दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आयएम मार्सेल एफ्रोइम्स्की (इस्राएल) आणि आयएम जंग मिन सेओ (स्वीडन) यांच्यापेक्षा एक गुण पुढे राहिला. प्रणीत सहा गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर होता पण टायब्रेकच्या कमी गुणांमुळे शेवटच्या टेबलमध्ये सहाव्या स्थानावर घसरला. प्रणित व्यतिरिक्त, प्रज्ञानंदनं व्हिक्टर मिखालेव्हस्की (आठवी फेरी), विटाली कुनिन (सहावी फेरी), मुखमदझोखिद सुयारोव (चौथी फेरी), सेमेन मुतुसोव्ह (दुसरी फेरी) आणि मॅथियास अनेलँड (पहिली फेरी) यांचा पराभव केला. त्यांचे इतर तीन सामने अनिर्णित ठरले.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)