Sunil Gavaskar: शेन वार्नबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सुनील गावस्करांनी व्यक्त केली खंत
Sunil Gavaskar: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (Sunil Gavaskar) यांचे नुकतंच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
![Sunil Gavaskar: शेन वार्नबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सुनील गावस्करांनी व्यक्त केली खंत Sunil Gavaskar Expresses Regret Over Ill-Timed Comment On Shane Warne Sunil Gavaskar: शेन वार्नबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सुनील गावस्करांनी व्यक्त केली खंत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/b477113a3e5e95ef90901f938ee640c7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sunil Gavaskar: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (Sunil Gavaskar) यांचे नुकतंच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. वॉर्नच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण क्रीडा जगतावर शोककळा पसरलीय. याचदरम्यान शेनवार्नबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं होतं. पण त्यांचे शब्द अनेकांना पटले नाहीत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर शोककळा पसरलेली असताना गावस्करांना त्यांच्या वक्तव्याबद्दल ट्रोल केलं गेलं. आता गावस्करांना आपल्या चुकीची उपरती झाली असून त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत खंत व्यक्त केलीय.
सुनील गावस्करांचं स्पष्टीकरण
गावसकर म्हणाले की, "क्रिकेटविश्वासाठी मागील आठवडा खूप वेदनादायी ठरला. आम्ही रॉडनी मार्श आणि शेन वॉर्नसारखे दोन महान खेळाडू गमावले आहेत. मला वॉर्न महान स्पिनर आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला आणि या प्रश्नाच्या उत्तरात मी माझे वैयक्तिक मतही दिलं. हा प्रश्न विचारायला नको होता. वॉर्नचं मूल्यमापन करण्याची ही योग्य वेळ नव्हती. तो महान क्रिकेटपटूंपैकी एक होता. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
सुनील गावस्कर काय म्हणाले होते?
नुकतीच सुनील गावस्कर यांनी इंडिया टूडेला मुलाखत दिली होती. त्यावेळी वॉर्न हे क्रिकेटमधला महान फिरकी गोलंदाज होते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर गावस्करांनी नाही असं उत्तर दिलं. माझ्यासाठी भारतीय फिरकीपटू आणि मुथय्या मुरलीधरन शेन वॉर्नपेक्षा सरस होते. शेन वॉर्नची भारताविरुद्धची कामगिरी अतिशय सामान्य आहे. त्यानं इंडिया हॉल नागपूरमध्ये फक्त एकदाच 5 विकेट घेतल्या होत्या. भारतीय फलंदाजासमोर त्यांना फारसे यश मिळाले नाही, जे खूप चांगले फिरकीपटू होते. शेन वार्न सर्वात महान फिरकीपटू होता, असं मी म्हणणार नाही. महान फिरकीपटूच्या यादीत मी मुरलीधरनला अव्वल स्थानी ठेवतो, असं सुनील गावस्कर म्हणाले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर?
शेन वॉर्न हा 708 विकेटसह कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन अग्रस्थानी आहे. ज्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट्स घेतले आहेत.
हे देखील वाचा-
- CSK Schedule in IPL 2022: आयपीएलमध्ये कधी, कुठे आणि कोणाशी भिडणार चेन्नईचा संघ; पाहा संपूर्ण वेळापत्रक
- IPL 2022: आरसीबीला मिळाला नवा कर्णधार? विराटनंतर 'हा' खेळाडू संघाची कमान संभाळण्याची शक्यता
- Pravin Tambe : 41 व्या वर्षी IPL च्या मैदानात, आता कारकिर्दीवर सिनेमा, कोण आहे प्रवीण तांबे?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)