Asia Cup 2022 : भारताचा माजी खेळाडू आशिया कपसाठी बांग्लादेश संघोसोबत, सांगतिली कशी असेल रणनीती?
Asia Cup 2022 News : बांग्लादेश संघ आशिया कप ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंका आणि फगणिस्तानसंघासोबत बी ग्रुपमध्ये आहे. पण सुपर 4 मध्ये भारत विरुद्ध बांग्लादेश सामना रंगू शकतो.
Asia Cup 2022 Sridharan Sriram : भारताचा माजी क्रिकेटर श्रीधरन श्रीराम (Sridharan Sriram) आशिया कप 2022 (Asia Cup 2022) साठी बांग्लादेश संघासोबत टेक्निकल कन्सलटंट अर्थात तांत्रिक सल्लागार म्हणून जोडला गेला आहे. दरम्यान त्याने आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चँलेजर्स बंगळुरुच्या (RCB) कोचिंग स्टाफमध्ये काम केलं असून आपला हाच अनुभव बांग्लादेशसोबत आशिया कपमध्ये वापरण्यास मदत होईल, असं त्याने यावेळी सांगितलं. 46 वर्षीय श्रीराम आशिया कपसोबतच ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आगामी टी20 विश्चचषकातही बांग्लादेश संघासोबत असणार आहे.
श्रीराम याने 2000 ते 2004 असे 4 वर्षे भारताकडून क्रिकेट खेळलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने 9 हजारहून अधिक रन केले आहेत. त्यानंतर 2016 साली ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन मुख्य कोच डेरेन लेहमन यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा स्पिन गोलंदाजी कोच म्हणून श्रीरामला नियुक्त करण्यात आलं होतं. 2020 मध्ये आरसीबीसाठी फलंदाजी आणि स्पिन कोच म्हणूनही त्याने काम केलं आहे.
कसं आहे वेळापत्रक?
आशिया कप 2022 साठी भारत पाकिस्तान हे संघ एकाच गटात असून हाँगकाँग संघानेही यामध्ये पात्रता मिळवली आहे. त्यानंतर दुसऱ्या गटात अर्थात ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. तर नेमकी स्पर्धा कशी खेळवली जाईल पाहूया...
ग्रुप स्टेजचे सामने
27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान
28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंककाँग
ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
हे देखील वाचा-