(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yuzvendra Chahal: एकच नंबर! चहलचा नवा लूक सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
South Africa tour of India 2022: पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ (India vs South Africa T20) भारतात पोहोचला आहे.
South Africa tour of India 2022: पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ (India vs South Africa T20) भारतात दाखल झालाय. दरम्यान, 9 जून रोजी या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. येत्या 5 जूनला भारतीय संघ दिल्लीला रवाना होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) नव्या लूकमध्ये दिसला आहे. चहलचा नवा लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. चहलच्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
हेअरस्टायलिस्ट्स अलीम हकीमनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर युजवेंद्र चहलच्या नव्या लूकचा फोटो शेअर केलाय. चहलच्या या फोटोला 'युजवेंद्र चहलचा फ्रेश समर कट', असं कॅप्शन देण्यात आलंय. आलिम हकीम हे बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट म्हणून ओळखले जातात. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीही केस कापण्यासाठी हकीम यांच्याकडं जातो. अलीम हकीमचं स्टाईल सेन्स त्याला इतर हेअरस्टायलिस्ट्सला मागं सोडतो. कदाचित यामुळेच बहुतेक सेलिब्रिटी नवीन लुकच्या शोधात अलीम हकीम यांच्या सलूनमध्ये जातात.
चहलची आयपीएल 2022 मधील कामगिरी
नुकताच पार पडलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राजस्थानकडून खेळताना युजवेंद्र चहलनं दमदार कामगिरी करून पर्पल कॅप जिंकली. त्यानं 17 सामन्यात 19.51 च्या सरासरीनं 27 विकेट्स घेतले. 40/5 ही त्याची या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी होती. या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणार्यांच्या यादीत वानिंदू हसरंगा 26 विकेट्ससह दुसऱ्या आणि कागिसो रबाडा (23 विकेट) तिसऱ्या क्रमांकावर होता. तसेच यंदाच्या हंगामात हॅट्रिक घेणारा युजवेंद्र चहल एकमेव गोलंदाज आहे.
अलीम हकीमची इंन्स्टाग्राम फोटो-
हे देखील वाचा-
- Arjun Tendulkar: '... तरच अर्जून तेंडुलकरला मुंबईच्या संघात जागा', गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड स्पष्टचं बोलले
- आकाश चोप्राच्या 'त्या' वक्तव्यावर भडकला पोलार्ड; आधी ट्वीट केलं, त्यानंतर थोड्यावेळानं...
- ENG vs NZ: जो रूटचा नवा पराक्रम! सचिन, द्रविडच्या पंक्तीत स्थान; मोठ्या विक्रमापासून फक्त 100 धावा दूर