एक्स्प्लोर

ENG vs NZ:  जो रूटचा नवा पराक्रम! सचिन, द्रविडच्या पंक्तीत स्थान; मोठ्या विक्रमापासून फक्त 100 धावा दूर

ENG vs NZ: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.

ENG vs NZ: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यानं या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 1000 धावांचा टप्पा गाठला आहे. त्यानं तब्बल सात संघाविरुद्ध 1000 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या कामगिरीसह त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि एलिस्टर कुकच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. एवढेच नव्हेतर, कसोटी क्रिकेटमधील 10 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला 100 धावांची गरज आहे. 

सात संघांविरुद्ध एक हजार आणि त्याहून अधिक कसोटी धावा करणारा चौथा खेळाडू
सात किंवा अधिक संघांविरुद्ध 1000 किंवा त्याहून अधिक कसोटी धावा करणारा जो रूट चौथा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि अॅलिस्टर कूक यांसारख्या दिग्गजांसह रूटच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. त्यानं पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध जो रूटच्या 1000 धावा पूर्ण
न्यूझीलंडविरुद्ध 11 धावा करत रूटनं किवी संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध 14 सामन्यातील 25 व्या डावात त्यानं एक हजार धावांचा टप्पा गाठला आहे. यात दोन शतक आणि पाच अर्धशतकाचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याची सर्वोच्च धावसंख्या 226 आहे.

10 हजारांचा टप्पा गाठण्यापासून 100 धावा दूर
कसोटी क्रिकेटमधील 10000 धावा पूर्ण करण्यापासून जो रूट केवळ 100 धावा दूर आहे. त्यानं 118 कसोटी सामन्यांच्या 217 डावात 9 हजार 900 धावा केल्या आहेत. रुट आता इंग्लंडच्या दुसऱ्या डावात किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात ही कामगिरी करू शकतो. ही खास कामगिरी करणारा तो जगातील 14वा आणि अॅलिस्टर कूकनंतर इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरेल. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 1st T20 Live Score : वैभव सूर्यवंशी खेळणार? श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली एका नव्या युगाची सुरुवात, किती वाजता सुरू होणार सामना?
वैभव सूर्यवंशी खेळणार? श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली एका नव्या युगाची सुरुवात, किती वाजता सुरू होणार सामना?
Hardik Pandya IPL Trade : एक-दोन नाही... तब्बल 7 फ्रँचायझी हार्दिक पांड्याच्या मागे! कोणता संघ खेळणार सर्वात मोठा डाव?, नाव आले समोर
एक-दोन नाही... तब्बल 7 फ्रँचायझी हार्दिक पांड्याच्या मागे! कोणता संघ खेळणार सर्वात मोठा डाव?, नाव आले समोर
Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा इंग्लंडमध्ये धुमाकूळ! नेट प्रॅक्टिसमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस, पाहा Video
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा इंग्लंडमध्ये धुमाकूळ! नेट प्रॅक्टिसमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस, पाहा Video
Ishan Kishan No-1 T20I Batter : तख्तापलट! दोन वर्षं संघाबाहेर राहून सोसला अपमान... आता इशान किशन बनला टी-20 क्रिकेटचा राजा
तख्तापलट! दोन वर्षं संघाबाहेर राहून सोसला अपमान... आता इशान किशन बनला टी-20 क्रिकेटचा राजा

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
Embed widget