Arjun Tendulkar: '... तरच अर्जून तेंडुलकरला मुंबईच्या संघात जागा', गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड स्पष्टचं बोलले
Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएलमध्ये पदार्पण करेल, अशी अपेक्षा केली जात होती.
Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएलमध्ये पदार्पण करेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, संपूर्ण हंगामात अर्जून तेंडुलकरला संपूर्ण हंगामात प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर अर्जून तेंडुलकरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान का मिळालं नाही? यावर अनेक दिग्गजांनी आपलं मत मांडलं होतं. मात्र, मुंबई इडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डनं यामागचं खरं कारण सांगितलं आहे. तसेच अर्जून तेंडुलकरला मुंबईच्या संघात स्थान मिळवण्यासाठी काय करावं लागेल? यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
शेन बॉन्ड काय म्हणाले?
दरम्यान, शेन बॉन्ड म्हणाले की, "अर्जुन तेंडुलकर फलंदाज आणि गोलंदाज म्हणून चांगला खेळाडू आहे. पण आता त्याला अधिक मेहनत करण्याची गरज आहे. त्यांना त्यांच्या कौशल्यात आणखी सुधारणा करावी लागेल. संघात सामील होणं ही वेगळी बाब आहे. परंतु, मुंबई इंडियन्ससारख्या संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट होण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागेल. अर्जुन तेंडुलकरचे फलंदाजी आणि गोलंदाजीचे कौशल्य चांगले होईल तेव्हा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल."
पदार्पणासाठी अर्जूनला आणखी वाट बघावी लागणार
अर्जून तेंडूलकरनं मुंबई लीग स्पर्धेत देशांतर्गत दोन सामने खेळले आहेत. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईला त्यांचा अखेरचा सामना दिल्लीविरुद्ध खेळायचा होता. या सामन्यात अर्जून तेंडूलकरला संघात संधी देण्यात येईल, अशी अपेक्षा केली जात होती. पण त्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्यानं तो चर्चेचा विषय ठरला.
मुंबईच्या संघाची आतापर्यंची सर्वात खराब कामगिरी
आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्ससाठी हा सर्वात खराब हंगाम होता. मुंबईनं 14 पैकी 10 सामने गमावले. हंगामाच्या सुरुवातीला सलग 8 सामने गमावून मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर सर्वात पहिला बाहेर पडला. या हंगामात मुंबईनं अनेक खेळाडूंना संधी दिली. परंतु, त्यांनाही मुंबईला विजयी मार्गावर घेऊन जाता आलं नाही.या हंगामातील अखेरच्या सामन्यांमध्ये टीम डेव्हिड आणि डॅनियल सेम्स यांनी मुंबईसाठी सामने जिंकले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मुंबईसाठी या हंगामातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना तिळक वर्मासारखा महान फलंदाज मिळाला. पुढच्या हंगामात मुंबईच्या संघ जोरदार कमबॅक करेल? अशी अपेक्षा केली जात आहे.
हे देखील वाचा-