South Africa squad for Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीमची घोषणा! 2 तगड्या खेळाडूंची संघात एन्ट्री; KKR स्टारचाही समावेश
ICC Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा थरार रंगणार आहे.
South Africa squad for Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा थरार रंगणार आहे. त्यासाठी आयसीसीने सर्व संघांना त्यांच्या टीमच्या यादी सुमारे 5 आठवड्यांपूर्वी सादर करण्यास सांगितले आहे. या कारणास्तव, सर्व टीम हळूहळू संघाची घोषणा करत आहेत, ज्यामध्ये आता दक्षिण आफ्रिकेचे नाव देखील समाविष्ट आहे. या स्पर्धेत ग्रुप बी मध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेने आपल्या 15 सदस्यीय संघात अनेक स्टार खेळाडूंना स्थान दिले आहे. टेम्बा बावुमा संघाचे नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात असे 10 खेळाडू आहेत जे 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये संघाचा भाग होते.
अँरिक नोर्किया आणि लुंगी एनगिडी यांचे पुनरागमन
कोलकाता नाईट राइडर्सने आयपीएल 2025 साठी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अँरिक नोर्किया (6.5 कोटी रुपये) साठी सर्वाधिक बोली लावली आणि संघात घेतले होते. त्यांची पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकाच्या संघात निवड झाली आहे.
वेगवान गोलंदाज अँरिक नोर्किया आणि लुंगी एनगिडी हे दोघेही दुखापतीतून बरे झाले आहेत. नोर्कियाच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, तर एनगिडी कंबरेच्या दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर होता. हे दोघे वेगवान गोलंदाजी विभागात कागिसो रबाडाला साथ देताना दिसतील, ज्यामध्ये काही वेगवान अष्टपैलू खेळाडू देखील असतील.
हे खेळाडू पहिल्यांदाच खेळणार आयसीसी स्पर्धा
दक्षिण आफ्रिकेनेही आपल्या संघात अशा काही चेहऱ्यांना संधी दिली आहे, जे पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यात टोनी डी जॉर्जी, रायन रिकलटन, ट्रिस्टन स्टब्स आणि विआन मुल्डर यांची प्रथमच संघात निवड झाली आहे. संघातील बहुतेक खेळाडू तेच आहेत जे 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात होते.
🚨SQUAD ANNOUNCEMENT🚨
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 13, 2025
White-ball head coach Rob Walter has today announced a 15-member squad for the ICC Champions Trophy 2025, which will be played in Pakistan from 19 February – 09 March.
One-Day International captain Temba Bavuma will lead the full-strength squad, which… pic.twitter.com/Bzt0rqjveG
स्पर्धेच्या ग्रुप बी मध्ये समाविष्ट असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ 21 फेब्रुवारी रोजी कराची येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपली मोहीम सुरू करेल. यानंतर ते 25 फेब्रुवारी रोजी रावळपिंडी येथे ऑस्ट्रेलियाशी आणि 1 मार्च रोजी शेवटच्या गट सामन्यात इंग्लंडशी सामना करतील.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जियोर्गी, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, अँरिक नोर्किया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन.
हे ही वाचा -