कसोटीतील पराभवाचा डाग हिटमॅन पुसून टाकणार; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करणार? जाणून घ्या दिग्गज काय म्हणाले?
Team India Squad Champions Trophy 2025 : आलीकडेच भारताला बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024/25 मालिका 3-1 ने गमावली.
Team India Squad Champions Trophy 2025 : आलीकडेच भारताला बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024/25 मालिका 3-1 ने गमावली. यानंतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या मालिकेत काही भारतीय खेळाडू वगळता, जवळजवळ संपूर्ण संघ काही विशेष कामगिरी करू शकला नाही. आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून कसोटीतील पराभवाचा डाग कर्णधार रोहित शर्माला पुसून टाकण्याची संधी आहे. यावेळी हायब्रिड मॉडेल अंतर्गत चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान आणि यूएईमध्ये होणार आहे. यासाठी या आठवड्याच्या अखेरीस भारतीय संघाची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. भारताच्या संघावरील चर्चेदरम्यान, एक मोठा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे की स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार कोण असावा. आधी शुभमन गिलचे नाव निश्चित मानले जात होते. पण आता यशस्वी जैस्वालही या शर्यतीत आला आहे.
यशस्वी जैस्वालने अद्याप एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही, पण तो टी-20 आणि कसोटी सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आता माजी भारतीय दिग्गज सुनील गावसकर यांचेही विधान समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी रोहितसोबत डावाची सुरुवात करणाऱ्या फलंदाजाची निवड जाहीर केली आहे.
🚨 INDIA’S CHAMPIONS TROPHY SQUAD ANNOUNCEMENT DATE 🚨
— Sports World 🏏⚽. (@ShamimSports) January 12, 2025
Team India’s squad for the 2025 Champions Trophy is expected to be revealed on January 19. 🏆🇮🇳
(Source: Sportstar) pic.twitter.com/ttMB7vYFj2
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हिटमॅन सोबत कोण करणार ओपनिंग?
स्टार स्पोर्ट्स शी चर्चेदरम्यान सुनील गावसकर यांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहितचा सलामीचा जोडीदार निवडण्यास सांगण्यात आले, ज्यामध्ये यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड हे संभाव्य उमेदवार होते. गावसकर यांनी निवडकर्त्यांसाठी सध्याची परिस्थिती कठीण असल्याचे वर्णन केले, परंतु जैस्वालला त्यांची निवड म्हणून निवडले.
शुभमन गिलला मिळणार नाही संघात स्थान?
यानंतर सुनील गावसकर यांना विचारण्यात आले की जर, रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी सलामी दिली तर शुभमन प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकेल का? यावर सुनील गावसकर म्हणाले, 'तिसरा नंबर विराट कोहली असेल, चौथा नंबर श्रेयस अय्यर आणि पाचव्या नंबरवर ऋषभ पंत असू शकतो.' अशा परिस्थितीत शुभमन गिलसाठी हे कठीण होऊ शकते.
शुभमन गिल बऱ्याच काळापासून रोहित शर्मासोबत एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामी देत आहे. पण त्याचा अलिकडचा फॉर्म फारसा चांगला राहिलेला नाही. अशा परिस्थितीत, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या कॉम्बिनेशनमध्ये बदल केले जातील का आणि यशस्वीला प्लेइंग-11 मध्ये संधी दिली जाते की नाही हे पाहणे बाकी आहे.
हे ही वाचा -