Smriti Mandhana : क्रिकेटमध्ये घडला मोठा चमत्कार, स्मृती मानधनाने मोडला मिताली राजचा सर्वात मोठा रेकॉर्ड; भारताने जिंकली मालिका
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्मृती मानधनाने शतक झळकावून इतिहास रचला आहे.
IND vs NZ Women 3rd ODI, Smriti Mandhana Century : एकीकडे भारतीय पुरुष संघाने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले 2 कसोटी सामने न्यूझीलंडकडून गमावले. दुसरीकडे, भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव करत 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली आहे. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्मृती मंधानाच्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर टीम इंडियाने सामना तसेच मालिकाही जिंकली. या सामन्यात स्मृती मानधनानेही शतक झळकावून नवा विक्रम रचला.
📸 💯@mandhana_smriti departs for a fantastic 100(122) as #TeamIndia edge closer to a win 👏
— BCCI Women (@BCCIWomen) October 29, 2024
Updates ▶️ https://t.co/B6n070iLqu#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/8KphaWYTQl
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत. किवी संघ 49.5 षटकांत 232 धावांत गारद झाला. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 तर प्रिया मिश्राने 2 बळी घेतले. न्यूझीलंडच्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात काही खास नव्हती. सलामीवीर शेफाली वर्मा 16 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर सलामीवीर स्मिती मानधना हिने यस्तिका भाटियासोबत अप्रतिम भागीदारी करत संघाची धावसंख्या 100 च्या जवळ नेली.
Led by Smriti Mandhana's brilliant century, the India batters secured a 2-1 series win over New Zealand 👊#INDvNZ 📝: https://t.co/o4Hxc6jz6b pic.twitter.com/fZ9wHsFaDj
— ICC (@ICC) October 29, 2024
स्मृती मानधनाने ठोकले ऐतिहासिक शतक
यस्तिका भाटिया बाद झाल्यानंतर मानधनाला कर्णधार हरमनप्रीत कौरची उत्कृष्ट साथ लाभली. यादरम्यान मानधना एकदिवसीय सामन्यात शतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरली. तिने वनडे कारकिर्दीतील 8 वे शतक झळकावले. अशाप्रकारे वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी ती भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. तिने मिताली राजचा 7 वनडे शतकांचा विक्रम मोडीत काढला.
महिला वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके
8 - स्मृती मानधना (88 डाव)
7 - मिताली राज (211 डाव)
6 - हरमनप्रीत कौर (116 डाव)
स्मृती मानधनाने 122 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 100 धावांची खेळी केली. मानधना बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने जेमिमासह 44.2 षटकांत 233 धावांचे लक्ष्य गाठले. अशा प्रकारे भारतीय संघाने एकदिवसीय मालिका 2-1 अशी खिशात घातली. भारताने पहिला एकदिवसीय सामना 59 धावांनी जिंकला तर दुसरा सामना न्यूझीलंडने जिंकला.
🚨 THE HISTORIC MOMENT. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 29, 2024
Smriti Mandhana surpasses Mithali Raj to have most hundreds for India in women's ODIs. 🥶 pic.twitter.com/Unwxh9qmtY
हे ही वाचा -