एक्स्प्लोर

मोठी बातमी: शुभमन गिलसह भारताच्या 4 क्रिकेटपटूंना सीआयडीचं समन्स, नेमकं प्रकरण काय?

गुजरात टायटन्सचे खेळाडू शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि मोहित शर्मा यांना ₹ 450 कोटींच्या BZ ग्रुप घोटाळ्याप्रकरणी गुजरात CID क्राईमने समन्स पाठवले आहे.

Shubhman Gill Chit Fund Frause Case : भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू एका मोठ्या चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीत अडकले आहेत. गुजरात पोलिसांच्या CID क्राईम ब्रँचने 450 कोटी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्याप्रकरणी भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल, राहुल तेवतिया, मोहित शर्मा आणि साई सुदर्शन यांना समन्स बजावले आहे. गुजरातस्थित कंपनीने गुंतवणूकदारांना बँकांपेक्षा जास्त व्याज देण्याचे आश्वासन दिले होते. पण, अनेक गुंतवणूकदारांनी त्यांचे व्याज न मिळाल्याने कंपनीविरुद्ध तक्रार केली होती. 

पॉन्झी योजनेचा सूत्रधार भूपेंद्र सिंग जाला यांच्याकडे चौकशी केल्यानंतर खेळाडूंना समन्स बजावण्यात आले आहे. या खेळाडूंनी गुंतवलेले पैसे परत केले नसल्याची माहिती जाला यांनी सांगितले. सीआयडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल टीम गुजरात टायटन्सचा कर्णधार गिल याने 1.95 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. इतर खेळाडूंनी खूपच कमी रक्कम गुंतवली होती. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी (BGT) गिल सध्या ऑस्ट्रेलियात असल्याने सीआयडी तो आल्यानंतर त्याची चौकशी करेल.

या घोटाळ्यात मेहता यांचा सहभाग आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सीआयडीने बँक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी टीम तैनात केली आहे आणि जाला यांचे एक अनधिकृत खातेही आहे. जे खातेपुस्तक जप्त करण्यात आले आहे. या संदर्भात सोमवारपासून ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे.

घोटाळ्याची रक्कम 450 कोटींहून अधिक

भूपेन्द्र सिंह जाला यांनी राजस्थानसह देशभरात आकर्षक गुंतवणूक योजनांचे जाळे पसरवले. कमी वेळीत जास्त व्याज देण्याचे आश्वासन देऊन पॉन्झी योजना सुरू केली. सुमारे 14 हजार लोकांनी या गुंतवणूक केली. ज्यामध्ये सीआयडीच्या प्राथमिक तपासात जाला यांनी 6000 कोटी रुपयांची मोठी फसवणूक केल्याची माहिती समोर आली. तपास जसजसा पुढे गेला तसतशी ही रक्कम 450 कोटींवर आणल्याचे आढळून आले. याप्रकरणी छापेमारी सुरूच आहे. या घोटाळ्याची रक्कम 450 कोटींहून अधिक असण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जाला यांची अनेक खाती आहे. त्या खात्यात सुमारे 52 कोटी रुपयांच्या व्यवहारांची नोंद झाली आहे. सध्याच्या तपासाच्या आधारे घोटाळ्याची एकूण रक्कम 450 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. छापेमारी सुरू राहिल्यास हे प्रमाण वाढू शकते.

हे ही वाचा -

Ind vs Aus 5th Test : ऋषभ पंत OUT, ध्रुव जुरेल IN; सिडनी कसोटी जिंकण्यासाठी गौतमची 'गंभीर' खेळी, टीम इंडियात 1, 2 नाही होणार इतके बदल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve on Walmik Karad : अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
Fetisch Barbie : 'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : देवेंद्र फडणवीसांनी कितीजणांना सोडलं, अडकवलं याच्या तपासासाठी SIT हवीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट : 02 Jan ABP MajhaRajan Salvi Full PC on Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार? राजन साळवींचं थेट उत्तर...Top 100 Headlines : सकाळच्या महत्त्वाच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 02 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve on Walmik Karad : अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
Fetisch Barbie : 'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut : बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
Santosh Deshmukh case: CID समोर सर्वात मोठं चॅलेंज, सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता, संतोष देशमुखांचा मारेकरी कसा सापडणार?
CID समोर सर्वात मोठं चॅलेंज, सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता, संतोष देशमुखांचा मारेकरी कसा सापडणार?
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Embed widget