एक्स्प्लोर
Shoaib Malik Car Accident: पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या कारला अपघात
अपघातात शोएब मलिक सुरक्षित आहे. या अपघातात शोएबच्या कारचे नुकसान झालं आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक हा अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला शोएबच्या कारने धडक दिली. मात्र, या अपघातात शोएब मलिक सुरक्षित आहे. या अपघातात शोएबच्या कारचे नुकसान झालं आहे. शोएब मलिक भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पती आहे.
लाहोरमधील नॅशनल हाय परफॉरमेंस सेंटरजवळील एका रेस्टॉरंटजवळ ट्रक उभा होता. त्यामुळे शोएब मलिकच्या स्पोर्ट्स कारने या ट्रकला जोरदार धडक दिली. स्पोर्ट्स कारचा पुढील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेबाबत शोएब मलिकने अद्याप कोणतेही वक्तव्य दिलेलं नाही.
पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, शोएबची स्पोर्ट्स कार वेगाने एनएचपीसीतून बाहेर पडली. ही कार वेगात असल्याने त्यावरील नियंत्रण सुटले होते. यामुळे ती घसरली आणि ट्रकला धडकली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
कोल्हापूर
पुणे
Advertisement