एक्स्प्लोर

IND vs BAN Shakib Al Hasan : माजी कर्णधारच्या जीवाला धोका! बोर्डाने सुरक्षा देण्यास दिला नकार; कानपूर कसोटी ठरणार शेवटची?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरमध्ये खेळवला जात आहे.

IND vs BAN Shakib Al Hasan : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. शाकिबने शेवटचा कसोटी सामना मीरपूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची इच्छा व्यक्त केली. पण बांगलादेशमध्ये धोका असल्यामुळे सुरक्षेबाबत खुद्द शाकिबने चिंता व्यक्त केली आहे. याबाबत त्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे सुरक्षेची मागणीही केली होती, मात्र बोर्डाने त्याला सुरक्षा देण्यास नकार दिला आहे.

शाकिबने सुरक्षेबाबत व्यक्त केली चिंता 

खरंतर, काही महिन्यांपूर्वी बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडले, त्यानंतर लष्कराने बांगलादेशचा ताबा घेतला. शेख हसीना सरकारमध्ये खासदार होत्या. याशिवाय बांगलादेशात उसळलेल्या दंगलीत एका तरुणाची हत्या केल्याचाही आरोप शाकिबवर आहे. शाकिबला बांगलादेश सोडून परदेशात शिफ्ट व्हायचे आहे.

आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत शाकिब म्हणतो की, मी बांगलादेशचा नागरिक आहे, त्यामुळे मला बांगलादेशात परत जाण्यास कोणतीही अडचण येऊ नये. पण बांगलादेशातील सुरक्षितता ही माझी चिंता आहे. माझे जवळचे मित्र आणि कुटुंबीय काळजीत आहेत. मला आशा आहे की गोष्टी चांगल्या होत आहेत. यावर काहीतरी तोडगा निघायला हवा.

बीसीबीने सुरक्षा देण्यास दिला नकार 

दुसरीकडे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शाकिबला सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. बीसीबीचे अध्यक्ष फारूख म्हणतात की, शाकिबची सुरक्षा बोर्डाच्या हातात नाही. मंडळ कोणत्याही व्यक्तीला खाजगी सुरक्षा देऊ शकत नाही. त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा.  BCB ही पोलीस किंवा RAB सारखी सुरक्षा संस्था नाही. याबाबत आम्ही कोणाशीही बोललो नाही. त्याची केस कोर्टात प्रलंबित असल्याने आम्ही त्यावर काहीही करू शकत नाही.

कानपूर कसोटी शाकिबचा शेवटचा सामना?

शाकिब अल हसनला बांगलादेशमध्ये सुरक्षा मिळेल तेव्हाच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका खेळू शकेल. अन्यथा कानपूर कसोटी सामना त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरेल.  

हे ही वाचा -

Dwayne Bravo IPL 2025 : IPLपुर्वी आणखी एक उलटफेर; केकेआरची मोठी खेळी, गंभीरच्या जागी धोनीच्या लाडक्या बनवले मेंटॉर

Ind vs Ban 2nd Test Live : रोहितने जिंकली नाणेफेक! गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, भारताने प्लेइंग-11 किती केले बदल?

IND vs BAN 2nd Test 2024 : कानपूर कसोटीवर संकटाचे काळे ढग... सामना रद्द झाला तर टीम इंडिला बसणार दणका, WTC पॉइंट टेबलमध्ये येणार खाली?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget