Shaheen Afridi On Virat Kohli : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीची विराट आणि बाबरच्या तुलनेवर प्रतिक्रिया, म्हणाला...
शाहीनने यावेळी जोस बटलर आणि मोहम्मद रिझवान यांच्यामध्ये कोण अधिक दमदार आहे, याबद्दलही शाहीननं आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Shaheen Afridi On Kohli & Babar : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा दबदबा मागील बरीच वर्षे आहे. पण अलीकडे तो खास फॉर्ममध्ये नसल्याचं दिसत आहे. त्यात पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सध्या तुफान फॉर्ममध्ये असल्याने त्याची विराटसोबत सतत तुलना केली जात आहे. नुकताच बाबरने विराटचा जलदगतीने एक हजार धावा करण्याचा विक्रम मोडला. त्यानंतर आता या दोघांच्या तुलनेबाबत पाकिस्तानचा युवा गोलंदाज शाहीन आफ्रिदीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या तुलनेबाबत बोलताना शाहीनने दोघेही माझे आवडते खेळाडू असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे स्वत: बाबर आझमने म्हटलं होतं की, 'विराट आणि माझ्यात तुलनेचा कोणताच प्रश्न नाही, विराटने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत बऱ्याच गोष्टी मिळवल्या आहेत. तो भारताचा दिग्गज खेळाडू आहे. तो आता ज्या स्थानावर आहे तिथे मी पोहचण्याचा प्रयत्न करत आहे.'
'मोहम्मद रिझवान जोस बटलरपेक्षा उत्तम'
यावेळी शाहीनने कोहली आणि बाबर शिवाय जोस बटलर आणि मोहम्मद रिझवान यांच्या तुलनेवरही प्रतिक्रिया दिली आहे. शाहीनच्या मते मोहम्मद रिझवान इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरपेक्षा अधिक चांगला फलंदाज आहे. दरम्यान रिझवान या पाकिस्तानच्या यष्टीरक्षक फलंदाजाने मागील काही काळात अत्यंत दमदार कामगिरी केली आहे. टी20 विश्वचषकातही त्याने तुफान फलंदाजी केली. ज्यानंतर अनेक विक्रमांना त्याने यावेळी गवसणी घातली. दुसरीकडे बटलरही तुफान कामगिरी करत असून आयपीएलही त्याने चांगलीच गाजवली.
बाबरनं मोडला विराटचा खास विक्रम
पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाची कमान हाती घेतल्यानंतर बाबरने 13 डावांत एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. भारतीच संघाचा कर्णधार असताना एक हजार धावा करण्यासाठी विराट कोहलीला 17 डाव लागले. बाबर आझमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार शतके झळकावणारा दुसरा खेळाडू बनण्याची संधी होती. मात्र, त्याच्याकडून ही संधी हुकली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आठ खेळाडूंनी सलग तीन शतके झळकावली आहेत. यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावाचाही समावेश आहे.
हे देखील वाचा-