Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ, अचानक मोहम्मद रिझवानला कर्णधारपदावरुन हटवले, कोणाला नियुक्त केले?
Shaheen Afridi Pakistan ODI Captain: पाकिस्तान संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेचा दुसरा सामना खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

Shaheen Afridi Pakistan ODI Captain नवी दिल्ली: पाकिस्तानमधील सरकार आणि क्रिकेट संघाचे कर्णधार कधी बदलतील हे कोणीही सांगू शकत नाही. 2023 च्या विश्वचषकानंतर सुरू झालेला कर्णधार बदलण्याचा ट्रेंड अजूनही सुरू आहे. पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. आता पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी शाहीन शाह अफ्रिदीची (Shaheen Afridi ) निवड करण्यात आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहीन आफ्रिदीला पाकिस्तानचा नवीन एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त (Shaheen Afridi Pakistan ODI Captain) केले आहे. शाहीन शाह अफ्रिदीने यापूर्वी टी-20 स्वरूपात कर्णधारपद भूषवले होते. मात्र टी-20 फॉरमॅटमधून शाहीन शाह अफ्रिद्रीला कर्णधारपदावरुन हटवण्यात आले. परंतु आता शाहीन अफ्रिदीला एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद देण्यात आले आहे. पाकिस्तान संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेचा दुसरा सामना खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. रिझवान आणि शाहीन दोघेही या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत.
Shaheen Afridi has been appointed Pakistan’s ODI Captain!#PakistanCricket #ShaheenAfridi #Muhammadrizwan💔 pic.twitter.com/5BPer4aK8x
— Salman Khan (@SalmanKhan76616) October 21, 2025
रिझवानने 20 पैकी 11 सामने गमावले-
मोहम्मद रिझवानने 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले, त्यापैकी नऊ सामने जिंकले आणि 11 सामने गमावले. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका जिंकली. तथापि, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही.
पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका-
पीसीबीच्या मते, निवड समिती आणि व्हाईट-बॉलचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांच्यातील बैठकीनंतर शाहीन आफ्रिदीला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. दक्षिण आफ्रिका पुढील महिन्यात पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. एकदिवसीय कर्णधार म्हणून शाहीन आफ्रिदीची ही पहिलीच मालिका असेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शाहीन आफ्रिदीचा एक चांगला विक्रम आहे. शाहीन अफ्रिदीने 66 सामन्यांमध्ये पाकिस्तानसाठी 131 विकेट्स घेतल्या आहेत.
















