एक्स्प्लोर

Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

Shahid Afridi slams Afghanistan : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही दिसून आला. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा  (3 Cricketers Die In PAK Airstrike) मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेतून (Tri-Series) माघार घेण्याचा निर्णय घेतला. या घटनेने संपूर्ण क्रीडा जगतात खळबळ उडाली. दरम्यान, माजी पाकिस्तान कर्णधार शाहिद आफ्रिदीने अफगाणिस्तानवर गंभीर आरोप केले. त्याने म्हटले आहे की, पाकिस्तानने केलेले उपकारअफगाणिस्तान विसरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या या दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष सुरु आहे. शुक्रवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात 48 तासांची शस्त्रसंधी झाली होती. मात्र, शांततेच्या काळात पाकिस्ताने अफगाणिस्तानमधील पक्तिका प्रांतामध्ये हवाई हल्ला केला. पाकिस्तानी हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. जिथे अफगाण क्रिकेटपटू कबीर, सिबगतुल्लाह आणि हारूनसह आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची जगभरात निंदा झाली, आयसीसीनेही मृत क्रिकेटपटूंबाबत शोक व्यक्त केला आहे.

शाहिद आफ्रिदी नक्की काय म्हणाला? 

पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना आफ्रिदी म्हणाला की, “मला कधी वाटले नव्हते की असे काही घडेल. गेल्या 50-60 वर्षांपासून आम्ही त्यांची काळजी घेत आहोत. मी स्वतः कराचीमध्ये 350 अफगाण कुटुंबांची जबाबदारी घेतली आहे. दोन्ही देश शेजारी आणि मुस्लिम राष्ट्रे असल्यामुळे सहकार्याची भावना ठेवली पाहिजे, हेच आमचे नेहमीचे मत राहिले आहे.”

“हे दुर्दैवी आहे की थेट बसून चर्चा करण्याऐवजी तुम्ही अशा लोकांशी हातमिळवणी केली, जे पाकिस्तानमध्ये बराच काळ दहशतवादात गुंतले आहेत. आम्ही नेहमीच तुमचे स्वागत केले, तुम्हाला आश्रय आणि काम-व्यवसायाची संधी दिली. पण आता तुम्ही त्याच लोकांशी हातमिळवणी करत आहात, जे आमच्या देशात दहशत माजवत आहेत,” असेही आफ्रिदीने स्पष्ट केले.

दरम्यान, अफगाणिस्तानने माघार घेतल्यानंतर झिम्बाब्वे या तिरंगा मालिकेत सहभागी होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 18 ऑक्टोबर रोजी याबाबत घोषणा केली. नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात ही मालिका 17 ते 29 नोव्हेंबरदरम्यान खेळली जाणार होती.

हे ही वाचा -

Rohit Sharma Popcorn : अरे भाई उसे पॉपकॉर्न मत दे...; रोहित शर्माला बघताच मित्र अभिषेक नायर भडकला, नेमकं काय म्हणाला?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget