मोठी बातमी, झिम्बॉब्वे दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियात बदल, पहिल्या दोन मॅचसाठी तीन युवा खेळाडूंना संधी, कारण समोर
IND vs ZIM : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका 6 जुलैपासून सुरु होणार आहे. या मालिकेत भारताचं नेतृत्त्व शुभमन गिल करतोय.
नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताची यंग ब्रिगेड शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्त्वात झिम्बॉब्वेच्या (Zimbabwe) दौऱ्यावर जाणार आहे. 6 जुलैपासून भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यामध्ये पाच टी20 सामन्यांची मालिका पार पडणार आहे. झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी निवड झालेल्या संघातील सदस्य संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे तिघे बारबाडोसमध्ये अडकून पडल्यानं ते भारतीय संघासोबत जॉईन होईपर्यंत साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा या तिघांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघ जाहीर करण्यात आला होता.
टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघासोबत यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे बारबाडोसमध्ये आहेत. हे तिघे भारतात बुधवारी सायंकाळी पावणे आठ वाजता भारतात दाखल होतील. त्यानंतर विश्रांती घेतल्यानंतर तीन सामन्यांसाठी ते हरारेला रवाना होतील.
बीसीसीआयचं ट्विट
🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) July 2, 2024
Sai Sudharsan, Jitesh Sharma and Harshit Rana added to India’s squad for first two T20Is against Zimbabwe.
Full Details 🔽 #TeamIndia | #ZIMvINDhttps://t.co/ezEefD23D3
पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडिया
शुभमन गिल (कर्णधार),ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, रिंकु सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), हर्षित राणा, रियान पराग, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या हर्षित राणाला पहिल्यांदा भारतीय संघात स्थान मिळालं आहे. झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी पहिल्यांदा भारतीय संघ जाहीर झाला होता त्यावेळी हर्षित राणाला भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यावेळी उलट सुलट चर्चा झाल्या होत्या. आता हर्षित राणाला भारतीय संघाता स्थान मिळालं आहे. यशस्वी जयस्वाल पर्याय म्हणून गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या साई सुदर्शनला संधी दिली गेलीय. तर, संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्माला संधी देण्यात आलीय. तर, शिवम दुबेच्या जागी हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे.
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच सामन्यांची टी 20 मालिका 6 जुलै रोजी सुरु होणार असून ती 14 जुलैपर्यंत चालणार आहे. यावेळी भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी शुभमन गिलकडे देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला...