Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या अपघातानांतर का भडकली रोहित शर्माची पत्नी रितीका? इन्स्टाग्राम स्टोरीतून शेअर केल्या भावना
Rishabh Pant News : रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने ऋषभ पंतचे अपघातानंतरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्यांबाबत राग व्यक्त केला आहे.
Ritika Sajdeh on Rishabh Pant Accident : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (30 डिसेंबर)सकाळी घडली. दिल्लीहून रुरकीला जात असताना पंतची कार महामार्गावरील रेलिंगला धडकून अपघात झाला. दरम्यान पंतच्या अपघातानंतर स्थानिकांनी त्याला मदत करत रुग्णालयात नेलं पण या दरम्यान पंतचे काही व्हिडीओ आणि फोटो उपस्थितांनी काढले जे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या गोष्टीवर कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) चिडली असून तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे.
रितिकाच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीत रितिकाने लिहिले आहे की, 'एखाद्या जखमी, दुखात असणाऱ्या व्यक्तीला त्याचे अपघातातील फोटो पोस्ट करायचे आहेत की नाही हे जाणून घेतल्याशिवाय ते शेअर करणं लाजिरवाणं आहे. त्याचे कुटुंबिय, मित्र-परिवार याना याने खूप त्रास होतो. ही चूकीची पत्रकारिता आहे.'
रितिकाची इन्स्टाग्राम स्टोरी-
पंतच्या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत फिरत आहेत. काही फोटोंमध्ये त्याच्या पाठीला झालेली दुखापत दिसत आहे. त्याचवेळी पंत काही व्हिडिओंमध्ये गंभीर जखमी झालेला दिसत आहे. सोशल मीडियावर असे फोटो आणि व्हिडिओ खूप शेअर होताना दिसत आहेत.
देवदूत बनून आला बसचालक सुशील कुमार
अपघात पाहून लगेचच बसचालक सुशील कुमारने बस थांबवली आणि 112 नंबरवर मदतीसाछी फोन करत पंतला रुग्णालयात पोहचवण्यात मदत केली. दरम्यान सुशील कुमारने आज तक वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत सांगितलं की...''मी हरयाणा रोडवेजचा ड्रायव्हर आहे. मी हरिद्वारवरुन येत होतो. तेव्हा मी नारसनजवळ पाहिलं की दिल्लीजवळू येणीर एक कार 60-70 च्या स्पीडवर असताना डिव्हायडरला धडकली.. मला वाटलं माझी बसही आता धडकेल पण मी कशी बशी बस बाजूला घेतली आणि उडी मारुन गाडीतील व्यक्तींना मदत कऱण्यासाठी पोहोचलो. कारमधून आग निघत होती आणि शेजारी एक व्यक्ती उभा होता, मी त्याला आणखी कोणी गाडीत आहे का? असं विचारलं तो नाही म्हणाला आणि मी ऋषभ पंत आहे असंही म्हणाला...मला क्रिकेटबाबत जास्त माहित नव्हतं. मी त्याच्या अंगावर एक चादर दिली आणि रुग्णालयात पोहचवलं.''
पंतच्या एमआरआय रिपोर्ट्सची प्रतिक्षा
बीसीसीआयने ट्वीटरच्या माध्यमातून ऋषभच्या प्रकृतीची माहिती दिली. अपघातात ऋषभच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत, त्याच्या उजव्या गुडघ्यालाही दुखापत झाली आहे आणि त्याच्या उजव्या मनगट, घोट्याला, पायाच्या बोटालाही दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही खरचटलं आहे. दरम्यान त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्याच्या दुखापतींचे प्रमाण आणि पुढील उपचारांसाठी येथे एमआरआय स्कॅन केले जाणार आहे.असं बीसीसीआयनं सांगितलं आहे.
हे देखील वाचा-