एक्स्प्लोर

Dhawan and Pant Video : शिखर धवनचा 'तो' सल्ला ऐकला असता, तर आज पंतवर ही वेळ आली नसती, पाहा VIDEO

Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ज्यानंतर त्याचा सलामीवीर शिखर धवनसोबत चर्चेच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Rishabh Pant and Shikhar Dhawan Video : भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला उत्तराखंडच्या रुरकी येथे शुक्रवारी सकाळी अपघात झाला. हायवेवरुन जात असताना पंतची गाडी रस्त्याशेजारच्या रेलिंगला आदळली आणि कारने पेट घेतला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे, पंतच्या अपघातानं संपूर्ण क्रिडाविश्वात खळबळ माजली आहे. अनेकजण पंतच्या सलामतीसाठी प्रार्थना करत आहेत..पंत सध्या नियतीशी झुंज देत रुग्णालयात उपचार घेत आहे...पण पंतवर ही वेळच आली नसती जर त्याने शिखर धवन (Shikhar Dhawan) याचा एक सल्ला ऐकला असता...धवन आणि पंत यांच्यातील आयपीएल दरम्यानच्या एका मजेशीर मुलाखतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून शिखरने पंतला गाडी कमी वेगात चालवण्याचा सल्ला या व्हिडीओत दिला होता...

भारतीय संघातील डावखुरा फलंदा पंत क्रिकेटचं मैदान असो किंवा गाडीचं स्टेअरिंग कायम टॉप गिअरमध्येच असतो. पण याच वेगानं त्याच्यावर आता रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. पंतच्या गाडीला अपघात झाल्यानं पंत गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या दरम्यान धवनने त्याला गाडी कमी वेगात चालवण्याचा सल्ला दिलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सकडून दोघेही आयपीएल खेळतानाचा आहे. एका मजेशीर मुलाखतीत पंत वेगवेगळे प्रश्न शिखरला विचारतो. यातील एका प्रश्नात पंत शिखरला ''मला काय सल्ला देशील?'' असं विचारलं असता गाडी थोडी कमी वेगात चालव असा सल्ला शिखरनं दिला. दरम्यान पंतनेही मी हे नक्की ऐकेन असं मान्य केलं होतं. पण याच वेगानं पंतचा अपघात झाला आहे आणि आता तो लवकर बरा होवो अशी प्रार्थना अवघं क्रिकेट जगत करत आहेत. 

पाहा VIDEO-

पंतच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयची माहिती

बीसीसीआयने ट्वीटरच्या माध्यमातून ऋषभच्या प्रकृतीची माहिती दिली. अपघातात ऋषभच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत, त्याच्या उजव्या गुडघ्यालाही दुखापत झाली आहे आणि त्याच्या उजव्या मनगट, घोट्याला, पायाच्या बोटालाही दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही खरचटलं आहे. दरम्यान त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्याच्या दुखापतींचे प्रमाण आणि पुढील उपचारांसाठी येथे एमआरआय स्कॅन केले जाणार आहे.असं बीसीसीआयनं सांगितलं आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget