एक्स्प्लोर

WTC Final 2023: WTC फायनलपूर्वी कर्णधार रोहित शर्मासमोर 3 मोठे प्रश्न, कसे सोडवणार?

WTC Final 2023: WTC फायनलपूर्वी कर्णधार रोहित शर्मासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे आहेत. ते त्याला सामन्यापूर्वी सोडवावेच लागणार आहेत.

WTC Final 2023: टीम इंडिया (Team india) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) अंतिम सामना 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. आता सामना सुरू होण्यासाठी दोन दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर मात्र सामन्यापूर्वी तीन मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. टॉसपूर्वी या तिनही प्रश्नांची उत्तरं रोहितला शोधावीच लागणार आहेत. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर असलेले तीन मोठे प्रश्न हे सर्व प्लेइंग 11 शी संबंधितच आहेत. जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल डब्ल्यूटीसी फायनलमध्ये सहभागी न झाल्यानं टीम इंडियाच्या आणि परिणामी कर्णधार रोहित शर्माच्या अडचणीत काहीशा वाढल्या आहेत. या मोठ्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत कोणत्या तीन खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देणं योग्य ठरेल? याचा योग्य निर्णय रोहितला टॉसपूर्वी घ्यावा लागेल. 

रोहितसमोरचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या लंडनच्या ओव्हल ग्राउंडवरील खेळपट्टीवर दोन स्पिनर्ससह उतरणं योग्य ठरेल का? रवींद्र जाडेजानं काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीनं सर्वांनाच थक्क केलं आहे. अशातच परदेशी मैदानावर जाडेजाची गोलंदाजी अश्विनपेक्षा अधिक प्रभावी ठरली आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये जाडेजाचा समावेश असणं जवळपास निश्चित आहे. तसेच, अश्विनचा अनुभव पाहता टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये त्यालाही जागा मिळू शकते. 

ईशान किशनची जागाही पक्की?

अपघातानंतर दुखापतग्रस्त झालेला टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत अजुनही उपचार घेत आहे. ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विकेटकीपर फलंदाज म्हणून केएस भरतची निवड करण्यात आली. भरतनं उत्तम विकेटकिपिंग केलं खरं, पण फलंदाजीत मात्र तो छाप पाडू शकला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये त्याच्याऐवजी ईशान किशनला संधी मिळू शकते. किशनची फलंदाजीची शैली पंतसारखीच आहे आणि तसेच, यापूर्वीही अडचणीच्या वेळी संघासाठी त्यानं महत्त्वाची कामगिरी केली आहे.  

तिसरा प्रश्न प्लेईंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या समावेशाचा आहे. शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांच्यात जागेसाठी लढत आहे. शार्दुलची खासियत म्हणजे, तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करतो. शार्दुलकडे फलंदाजीमध्येही महत्त्वाचं योगदान देण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत उमेश यादवऐवजी शार्दुलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचे डिटेल्स 

• तारीख : 7 ते 11 जून, 2023 
• ठिकाण : द ओवल मैदान, लंडन 
• संघ : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया 
• रिझर्व डे : 12 जून

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

WTC Final Rahul Dravid: ICC ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियावर दबाव? WTC फायनलपूर्वी हेड कोच द्रविड म्हणतो...

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 2nd Test Day-3 Stumps : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला! दिवसभर भारताचा दबदबा, पण अखेर सोनल दिनूषाने खेळ फिरवला; श्रीलंका 265/8, फॉलोऑनपासून काही पावलं दूर
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला! दिवसभर भारताचा दबदबा, पण अखेर सोनल दिनूषाने खेळ फिरवला; श्रीलंका 265/8, फॉलोऑनपासून काही पावलं दूर
Duleep Trophy : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत नापास, गोलंदाजीत पास; 1 डाव अन् 210 धावांनी विरोधी टीमचा पराभव, थेट गाठली सेमीफायनल
वैभव सूर्यवंशी फलंदाजीत नापास, गोलंदाजीत पास; 1 डाव अन् 210 धावांनी विरोधी टीमचा पराभव, थेट गाठली सेमीफायनल
IND vs SL 2nd Test : डोळे वटारले, बॅट आपटली! यशस्वी, फर्नांडोनंतर आणखी एक खेळाडू गोत्यात; मैदानात असं काय घडलं की ICC थेट मोठी शिक्षा सुनावली, पाहा VIDEO
डोळे वटारले, बॅट आपटली! यशस्वी, फर्नांडोनंतर आणखी एक खेळाडू गोत्यात; मैदानात असं काय घडलं की ICC थेट मोठी शिक्षा सुनावली, पाहा VIDEO
IND vs SL 2nd Test Sarfaraz Khan : सरफराज खानने डिवचताच श्रीलंकन कॅप्टन वैतागला अन् मग जे घडलं ते पाहून सगळेच चक्रावले! मैदानावर नेमकं काय घडलं?
सरफराज खानने डिवचताच श्रीलंकन कॅप्टन वैतागला अन् मग जे घडलं ते पाहून सगळेच चक्रावले! मैदानावर नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praja Foundation Mumbai MLA Report Card 2026: काँग्रेसचे आमदार अव्वल, आदित्य ठाकरे 18 व्या स्थानावर; प्रजा फाउंडेशनकडून मुंबईतील 36 आमदारांचं प्रगतीपुस्तक जाहीर
काँग्रेसचे आमदार अव्वल, आदित्य ठाकरे 18 व्या स्थानावर; प्रजा फाउंडेशनकडून मुंबईतील 36 आमदारांचं प्रगतीपुस्तक जाहीर
CTET Exam 2026: 'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
Rohit Pawar Speculation to join Congress: रोहित पवारांची पावलं वेगळ्याच दिशेने? 'या' तीन घटनांमुळे चर्चांना उधाण, काँग्रेसमध्ये जाण्याची जोरदार चर्चा?
रोहित पवारांची पावलं वेगळ्याच दिशेने? 'या' तीन घटनांमुळे चर्चांना उधाण, काँग्रेसमध्ये जाण्याची जोरदार चर्चा?
Mumbai Ganeshotsav : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
Embed widget