Rishabh Pant : इकडे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेट किपिंगसाठी KL राहुलचं नाव चर्चेत, तिकडे ऋषभ पंतचा मोठा निर्णय!
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.
Rishabh Pant Ranji Trophy Delhi vs Saurashtra : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) 18 किंवा 19 जानेवारी रोजी संघाची घोषणा करू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेट किपिंगसाठी के एल राहुलचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार ऋषभ पंतचा मोठा निर्णय घेतला आहे.
खरंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय क्रिकेटपटूंना इतका मोठा धक्का बसला आहे की, ते सर्वजण एकामागून एक रणजी सामन्यांमध्ये खेळताना दिसत आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनंतर आता ऋषभ पंतने रणजी ट्रॉफीसाठी स्वतःला उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अशोक शर्मा यांनी सांगितले की, पंत सौराष्ट्र विरुद्ध दिल्लीच्या रणजी सामन्यात खेळणार आहे. हा सामना 23 जानेवारीपासून राजकोटमध्ये खेळला जाईल.
ऋषभ पंतने 2017-2018 च्या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले होते. दिल्लीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये विराट कोहलीचाही समावेश करण्यात आला आहे. कोहली खेळेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. जर कोहली सौराष्ट्राविरुद्ध खेळला तर तो पंतसोबत रणजी सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. कोहलीने त्याचा शेवटचा रणजी सामना 2012 मध्ये खेळला होता.
डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा यांनी मंगळवारी सांगितले की, 'हो, पंतने पुढील रणजी सामन्यासाठी त्याची उपलब्धता निश्चित केली आहे. आणि तो थेट राजकोटमध्ये संघात सामील होईल. आम्हाला विराट कोहलीनेही खेळावे असे वाटते. पण त्याच्याकडून त्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. हर्षित राणाची भारतीय टी-20 संघात निवड झाली आहे, त्यामुळे तो उपलब्ध राहणार नाही. दिल्लीला रणजी लीग टप्प्यात दोन सामने खेळायचे आहेत. दिल्लीचा संघ पाच सामन्यांत 14 गुणांसह ग्रुप डी मध्ये पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.
शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल हे देखील आपापल्या संघांकडून खेळतील अशी अपेक्षा आहे. मंगळवारीच रोहित शर्मा मुंबई संघासोबत दिसला. त्याने त्याच्या रणजी संघातील सहकाऱ्यांसोबत सराव केला.
Some #RanjiTrophy news: Rishabh Pant @RishabhPant17 will be joining Delhi @delhi_cricket squad in Rajkot for next Ranji Trophy match against Saurashtra, confirmed DDCA secretary Ashok Sharma "Mama" to @PTI_News
— Kushan Sarkar (@kushansarkar) January 14, 2025
हे ही वाचा -