Gautam Gambhir Manager : गौतम गंभीरवर BCCIचा पहिला वार! सावलीसारखी सोबत असलेल्या व्यक्तीवर घातली 'बंदी', जाणून घ्या कारण
टीम इंडियाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कठोर कारवाई केली आहे.
BCCI Take Action on Gautam Gambhir : टीम इंडियाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कठोर कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर बीसीसीआयने आढावा बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले. 6 महिन्यांपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले गौतम गंभीर यांच्यावरही बीसीसीआयने पहिला वार केला आहे. गंभीरसोबत सावलीसारखा असलेल्या माणसावर बोर्डाने अनेक प्रकारे बंदी घातली आहे. बीसीसीआयने परदेशी दौऱ्यांच्या नियमांमध्येही काही बदल केले आहेत. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर बोर्डाने हे मोठे पाऊल उचलले आहे.
जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा मॅनेजर आता टीम इंडियासोबत प्रवास करू शकणार नाहीत. त्याला टीम बसमध्ये बसण्याची परवानगीही दिली जाणार नाही. गंभीर जेव्हा मुख्य प्रशिक्षक झाला तेव्हा बीसीसीआयने त्यांच्या सर्व गोष्टी मान्य केल्या, परंतु त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाची कामगिरी खराब राहिली आहे. हे पाहून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पहिल्यांदाच त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
गौतम गंभीरच्या मॅनेजरवर बंदी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने गौतम गंभीरचा मॅनेजर गौरव अरोरा यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. त्याला आता गंभीरसोबत हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर ते एकत्र आले तर त्यांना स्वतःसाठी वेगळे हॉटेल बुक करावे लागेल आणि बीसीसीआय त्याचा खर्च उचलणार नाही. याशिवाय त्याला टीम इंडियाच्या बसमध्ये बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. गौरव अरोरा आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊ शकणार नाही आणि टीमसोबत बसमध्येही बसू शकणार नाही.
याशिवाय गौतम गंभीरच्या आणखी दोन जवळच्या सहकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. अहवालानुसार, बीसीसीआय फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टेन डोइशे यांच्या कामावरही खूश नाही. गंभीरच्या विनंतीवरून हे दोघेही टीम इंडियाशी जोडले गेले होते, पण आता त्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बीसीसीआयचे खेळाडू आणि कुटुंबांसाठी नवे नियम
- जर स्पर्धा किंवा मालिका 45 दिवस अथवा त्यापेक्षा अधिक दिवसांची असेल तर खेळाडूंचे कुटुंबीय फक्त 14 दिवस त्यांच्यासह राहू शकतात.
- जर स्पर्धा किंवा मालिका 45 दिवसांपेक्षा कमी दिवसांची असेल तर कुटुंबीय रक्त 7 दिवस सोबत राहू शकतात.
- खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासह संपूर्ण स्पर्धेसाठी सोबत राहू शकत नाही.
- खेळाडूंचे कुटुंबीय त्यांच्यासह फक्त 2 आठवडे राहू शकतात.
- मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा पर्सनल मॅनेजरला टीम बस किंवा व्हीआयपी बॉक्समध्ये येण्याची परवानगी नसेल. पर्सनल मॅनेजरलाही वेगळ्या हॉटेलमध्ये राहावे लागले.
- जर खेळाडूंच्या सामनाचं वजन 150 किलोपेक्षा अधिक असेल तर बीसीसीआय खेळाडूंच्या सामनासाठी अधिक पैसे देणार नाही.
हे ही वाचा -