Rinku Singh: हार्दिक पांड्यानंतर रिंकू सिंग 'मिस्ट्री गर्ल' मुळं चर्चेत, झिम्बॉब्वेतील 'त्या' व्हायरल व्हिडीओनं तर्क वितर्क सुरु
IND vs ZIM: भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील चौथी मॅच आज होणार आहे. या मॅचपूर्वी रिंकू सिंगचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Rinku Singh With Mystery Girl In Zimbabwe हरारे: शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्त्वात टीम इंडियाची यंग ब्रिगेड झिम्बॉब्वेच्या (Zimabwe) दौऱ्यावर आहे.भारतानं पहिली मॅच गमावल्यानंतर पुढील दोन मॅचमध्ये विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे. भारतानं झिम्बॉब्वेवर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. रिंकू सिंगनं (Rinku Singh) दुसऱ्या मॅचमध्ये 48 धावांची शानदार खेळी केली होती. तर, तिसऱ्या मॅचमध्ये रिंकूनं केवळ एक रन केली होती. भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात चौथी टी -20 मॅच आज होणार आहे. या मॅचपूर्वी रिंकू सिंगचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रिंकू सिंग सोबत एक मिस्ट्री गर्ल आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्या देखील काही दिवसांपूर्वी मिस्ट्री गर्ल सोबतच्या फोटोमुळं चर्चेत होता. हार्दिक पांड्यासोबत असणारी ती मुलगी प्राची सोळंकी होती.
रिंकू सिंग सोबत व्हिडीओत असलेली मिस्ट्री गर्ल ही शुभमन गिलची (Shubman Gill) बहीण शहनील गिल (Shahneel Gill) आहे. टीम इंडियानं काही दिवसांपूर्वी झिम्बॉब्वेतील प्राणी संग्रहालयाला भेट दिली होती. तेव्हाचा रिंकू सिंग आणि शहनील गिल यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शहनील गिल अन् रिंकू सिंग आनंदी असल्याचं पाहायला मिळतं.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
शुभमन गिलच्या नेतृत्त्वात पहिल मालिका विजय मिळणार?
शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडियाची यंग ब्रिगेड झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर गेली आहे. शुभमन गिलनं यापूर्वी गुजरात टायटन्सचं कॅप्टन पद भूषवलं होतं. आता शुभमन गिल पहिल्यांदा टीम इंडियाचं नेतृत्त्व करत आह. पहिल्या टी 20 मॅचमधील पराभवानंतर टीम इंडियानं कमबॅक केलं आहे. भारतानं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडे आजची मॅच जिंकून मालिका विजयाची संधी आहे. चौथी मॅज आज तर पाचवी मॅच उद्या म्हणजेच 14 जुलै रोजी होणार आहे. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत मालिका जिंकण्याच्या इराद्यानं शुभमन गिलच्या नेतृत्त्वात मैदानात उतरेल. तर, झिम्बॉब्वेकडे देखील विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे.
रिंकू सिंग फॉर्ममध्ये
रिंकू सिंग चांगल्या फॉर्रममध्ये आहे. रिंकू सिंग पहिल्या मॅचमध्ये शुन्यावर बाद झाला होता. तर, दुसऱ्या मॅचमध्ये रिंकू सिंगनं 48 धावांची खेळी केली होती. तिसऱ्या मॅचमध्ये रिंकू 1 रन करुन नाबाद राहिला.
संबंधित बातम्या :