Yuvraj Singh Video : 6,6,6,6,6.. युवराज सिंगच्या वादळात ऑस्ट्रेलिया पुन्हा ढेर, सिक्सर किंगची तडाखेबंद फलंदाजी, पाहा व्हिडीओ
Yuvraj Singh: टीम इंडियाचा आक्रमक खेळाडू युवराज सिंगनं पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स लीगमध्ये युवराज सिंगनं 28 बॉलमध्ये 59 धावांची खेळी केली.
![Yuvraj Singh Video : 6,6,6,6,6.. युवराज सिंगच्या वादळात ऑस्ट्रेलिया पुन्हा ढेर, सिक्सर किंगची तडाखेबंद फलंदाजी, पाहा व्हिडीओ yuvraj singh 59 runs in 28 balls with 5 sixes against australia marathi news watch video Yuvraj Singh Video : 6,6,6,6,6.. युवराज सिंगच्या वादळात ऑस्ट्रेलिया पुन्हा ढेर, सिक्सर किंगची तडाखेबंद फलंदाजी, पाहा व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/13/3dd06efa7893cc0367b300eaa4db9a331720849970163989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बर्मिंघम : वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स लीग सध्या सुरु आहे. या लीगमध्ये इंडिया चॅम्पियन्स आणि ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स (IND-C vs AUS-C) यांच्यात उपांत्य फेरीची लढत सुरु होती.भारताच्या संघाचं नेतृत्व युवराज सिंग करत होता. युवराज सिंगनं पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली आहे. युवराज सिंगनं (Yuvraj Singh) यापूर्वी देखील उपांत्य फेरीच्या लढतींमध्ये किंवा नॉकआऊट लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाची धुलाई केली आहे. 2007 टी20 वर्ल्ड कप, 2011 वनडे मध्ये नॉकआऊट लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध युवराज सिंगनं जोरदार फटकेबाजी केली होती. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स विरुद्ध देखील उपांत्य फेरीच्या लढतीत युवराज सिंगनं आक्रमक फलंदाजी केली.
बर्मिंघमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंडस लीग मध्ये युवराज सिंगनं सेमी फायनलच्या लढतीत युवराजनं पाच षटकारांच्या मदतीनं 28 बॉलमध्ये 59 धावांची खेळी केली. युवराज सिंगनं पाच षटकार आणि चार चौकार मारले. युवराज सिंगची ही कामगिरी पाहून चाहत्यांना 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्यानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या 30 बॉल मधील 70 धावांच्या खेळीची अनेकांना आठवण झाली.
युवराज सिंगनं 28 बॉलमध्ये 59 धावा केल्या. युवराज सिंग शिवाय रॉबिन उत्थाप्पानं देखील दमदार कामगिरी केली. त्यानं 65 धावा केल्या. इरफान पठाण आणि युसूफ पठाण या दोघांनी देखील ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. इरफाण पठाणनं 19 बॉलमध्ये 50 धावा तर युसूफ पठाणनं 23 बॉलमध्ये 51 धावा केल्या. या मध्ये युवराज सिंगच्या खेळीवर नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. युवराज सिंग ज्यावेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची धुलाई करत होता. त्यावेळी चाहत्यांना जुने दिवस आठवत होते.
पाहा व्हिडीओ :
YUVRAJ SINGH - CLASS PERSONIFIED. 😍❤️
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 12, 2024
- The elegance of Yuvi, a sublime knock of 59 (28). 🐐pic.twitter.com/ldbBgtTVOx
ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया चॅम्पियन्स लीजेंडसनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 6 विकेट वर 254 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा संघ 168 धावा करु शकला. इंडिया चॅम्पियन्सकडून युवराज सिंग 28 बॉलमध्य 59 धावांची खेळी केली. याशिवाय इरफान पठाण, युसूफ पठाण आणि रॉबिन उत्थाप्पानं देखील अर्धशतक केलं. धवल कुलकर्णी, पवन नेगी यांनी ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट घेतल्या. हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी एक एक विकेट घेतली.
पाकिस्तानचा वचपा काढण्याची संधी
ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर युवराज सिंगच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंडस लीगच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. आता अंतिम फेरीच्या लढतीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल. 13 जुलै म्हणजेच आजच ही लढत होणार आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)