Ranji Trophy: रणजीत मुंबईच्या संघाची कमाल, 10 व्या आणि 11 व्या फलंदाजांनी शतकं ठोकली, तुषार देशपांडेची विक्रमी खेळी
Mumbai Ranji Team: रणजी करंडकाच्या इतिहासात तळाच्या दोन्ही फलंदाजांनी एकाच डावात शतकं झळकावण्याची ही घटना पहिल्यांदाच पाहायला मिळाली.
मुंबई: मुंबईच्या संघाने पहिल्या डावातल्या 36 धावांच्या आघाडीच्या जोरावर बडोद्याला हरवून, आज रणजी करंडकाच्या (Ranji Trophy) उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यात मुंबईच्या दहाव्या आणि अकराव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी बडोद्याचे चक्क बारा वाजवले. मुंबईच्या अनुक्रमे तनुष कोटियन (Tanush Kotian) आणि तुषार देशपांडे (Tushar Deshpande) या तळाच्या शिलेदारांनी बडोद्याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवून वैयक्तिक शतकं झळकावली.
रणजी करंडकाच्या इतिहासात तळाच्या दोन्ही फलंदाजांनी एकाच डावात शतकं झळकावण्याची ही घटना पहिल्यांदाच पाहायला मिळाली. त्या दोघांनी दहाव्या विकेटसाठी 40 षटकांत तब्बल 232 धावांची भागीदारीही रचली. त्यात तुषार देशपांडेचा वाटा 129 चेंडूंत 123 धावांचा होता. त्याच्या शतकाला 10 चौकार आणि आठ षटकारांचा साज होता. तनुष कोटियननं १२९ चेंडूंत दहा चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 120 धावांची खेळी उभारली. त्यामुळं मुंबईला दुसऱ्या डावात 569 धावांचा डोंगर उभारता आला.
मुंबईच्या संघाने पहिल्या डावात 384 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बडोद्याने 348 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात मुंबईने 569 धावा केल्या. यामध्ये तनुष आणि तुषारच्या शतकांचा मोठा वाटा आहे. आता बडोद्याला जिंकण्यासाठी 600 धावांची गरज होती. बडोद्यानं दुसऱ्या डावात तीन बाद 121 धावांची मजल मारली.
कोटियन-देशपांडेचा रणजीत भीमपराक्रम
बडोद्याविरुद्ध सामन्यात मुंबईच्या दुसऱ्या डावात तळाच्या कोटियन आणि देशपांडे यांची शतकं रणजीच्या इतिहासात तळाच्या दोन फलंदाजांनी पहिल्यांदाच एका डावात झळकावली शतकं तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे आता चंदू सरवटे आणि शूटे बॅनर्जींच्या पंक्तीत दाखल झाला आहे. १९४६च्या इंग्लंड दौऱ्यात सरेविरुद्ध भारताच्या सरवटे आणि बॅनर्जींची तळाच्या क्रमांकावर फलंदाची करताना शतकं ठोकण्याची कामगिरी केली होती.
तुषार देशपांडेची कमाल
तुषार देशपांडे हा 11 वा फलंदाज म्हणून मैदानात उतरला होता. तुषारने १२९ चेंडूंत १२३ धावा केल्या. त्याच्या या खेळीत एक चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. तुषारने या कामगिरीने ७८ वर्ष जुना असलेला विक्रम मोडीत काढला. तनुष कोटियन भारताच्या अंडर 19 संघाचा सदस्य राहिलाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तनुष मुंबईकडून खेळतो. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तनुष यानं आतापर्यंत 10 अर्धशतकं ठोकली आहे, पण त्याचं हे पहिलंच शतक ङोय. तनुष यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 38 च्या सरासरीने 915 धावा चोपल्या आहेत.
आणखी वाचा
12 वर्षांपासून अजिंक्य, सलग 17 मालिका खिशात, मायदेशातील भारताच्या विजयाचं रहस्य काय?