(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ranji trophy 2022: अजिंक्य रहाणेचं टीकाकऱ्यांना प्रत्युत्तर, रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी झळकावलं शतक
Ajinkya Rahane Century: भारताचा क्रिकेटरटू अजिंक्य रहाणेला गेल्या दोन वर्षांपासून मोठी धावसंख्या करण्यास अपयश येत होतं.
Ajinkya Rahane Century: भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला गेल्या दोन वर्षांपासून मोठी धावसंख्या करण्यास अपयश येत होतं. ज्यामुळं त्याला टीकेचा धनी व्हावं लागलं होतं. एवढेच नव्हेतर, आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायझींनी त्याला खरेदी करण्यासाठी उस्तुकता दाखवली नाही. अखेर कोलकाताच्या संघानं अजिंक्य रहाणेला त्याच्या मूळ किंमतीत खरेदी केलं. मात्र, रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी अजिंक्य रहाणेनं सर्वांना आपली झलक दाखवलीय. त्यानं सौराष्ट्रविरुद्ध नरेंद्र मोदी स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावलंय. त्यानं या सामन्यात केवळ शतकच केले नाही तर 44 धावांत 3 विकेट गमावलेल्या आपल्या संघालाही सावरलं आहे. अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या जोरावर मुंबईच्या संघानं रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी विकेट्स गमावून 263 धावा केल्या आहेत.
रणजी ट्रॉफी 2022 चा पहिला सामना मुंबई आणि सौराष्ट्रात सुरु आहे. मुंबईचे कर्णधार पृथ्वा शॉनं या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईची सुरुवात खराब झाली. सौराष्ट्राच्या गोलंदाजांनी 44 धावांवर मुंबईच्या टॉपच्या खेळाडूंना माघारी धाडलं. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या अजिंक्य रहाणं मुंबईचा डाव सावरला आणि संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. या सामन्यात रहाणेनं 212 चेंडूत 100 धावा केल्या. यात 14 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रहाणे 108 धावांवर नाबाद परतला.
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 5 हाजारांचा टप्पा गाठण्याच्या रहाणे खूपच जवळ आहे. मागील काही दिवसांपासून रहाणेची कामगिरी अतिशय निराशाजनक होती. त्यानं गेल्या 19 कसोटी सामन्यात 24 च्या सरासरीनं 819 धावा केल्या आहेत. तर, गेल्या दीड वर्षात त्याला एकही शतक झळकावता आलं नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. एवढेच नव्हेतर, अजिंक्य रहाणेला भारतीय क्रिकेट संघातून ड्रॉप करण्यात येईल, अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अशा चर्चांना अजिंक्य रहाणेनं पूर्णविराम लावलाय.
हे देखील वाचा-
- Aaron Finch On IPL: मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरलेल्या आरोन फिंचचं आयपीएलबाबत मोठं वक्तव्य
- IND Vs WI: अखेरच्या टी-20 सामन्यात प्रेक्षकांना परवानगी, बीसीसीआयचा मोठा निर्णय
- IND vs WI 1st T20: भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात विक्रमांचा पाऊस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha